नेशन न्युज मराठी टिम.
मुंबई – भारत-जपान राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत, 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही जपानी सिनेमा दाखवला जाणार आहे. उभय राष्ट्रांमधील बंध अधिक दृढ करण्यासाठी, पाच जपानी लघुपटांचे विशेष पॅकेज मिफ्फमध्ये उद्या संध्याकाळी 6 वाजता, मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजन संकुलामधल्या ऑडी-I, येथे प्रदर्शित करण्यात येणार आहे.
या पॅकेजमध्ये ‘शॉर्ट शॉर्ट्स फिल्मस् आणि आशियातील पाच शॉर्ट फिक्शन फिल्म्सचा समावेश आहे. शॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हल आणि आशियातील SSFF आणि ASIA) हा 1999 पासून टोकियोमध्ये आयोजित केला जात असलेला वार्षिक ऑस्कर-पात्र लघुपटांचा महोत्सव आहे. हा आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांपैकी एक आहे.
या विशेष पॅकेज अंतर्गत प्रदर्शित होणार्या चित्रपटांवर एक नजर टाकूया-
1. होम अवे फ्रॉम होम
दिग्दर्शक: जेम्स जिराजू
एक टॅक्सी चालक, तरुण मुलगी आणि ‘बॅकर पॅकर’ टोकियोमधून प्रवास करतात. हे तिघेही अनुक्रमे आफ्रिका, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियातील त्यांच्या प्रत्येक घराशी जोडलेले आहेत. अकिको ही एक जपानी महिला देखील सर्व प्रवासात सहभागी झालेली आहे, अशी या अनोख्या प्रवासाची ही कथा आहे.
2. शेक्सपियर इन टोकियो
दिग्दर्शक: युकू सायटो
डाउन सिंड्रोमने ग्रस्त असलेला एक ऑस्ट्रेलियन व्यक्ती शेक्सपियरचा चाहता आहे. धाक दाखवणाऱ्या आपल्या मोठ्या भावापासून दूर जाण्यासाठी आणि आपले स्वातंत्र्य, अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तो टोकियोमध्ये एकटाच साहसी प्रवासाला निघतो . प्रवासामध्ये तो आपल्याला असलेले राष्ट्रीय गीतांबद्दलचे ज्ञान, आपली चित्रपुस्तिका आणि बुद्धिमत्तेचा वापर, भेटणा-या लोकांची मने जिंकण्यासाठी करतो.
3. जोसेज् टूर डी टोकियो
दिग्दर्शक: किमीई तनाका
हा चित्रपट जोस नावाच्या एका तरुण मेक्सिकन माणसाची कथा आहे. तो समाज माध्यमातील प्रभावी अॅलेक्ससाठी काम करत असतो. कामासाठी त्याने टोकियोला पहिल्यांदाच भेट दिली आहे. कामाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नात शहरामध्ये धावपळ करताना , जोसला या शहरामध्ये किती आकर्षणे आहेत हे कळते.
4. धिस इज टोकियो
दिग्दर्शक: बेन सुझुकी
हा चित्रपट केंटो आणि अॅलिसची कथा आहे. सिंगापूरच्या एका कंपनीत कर्मचारी म्हणून निवड झालेल्या केंटोला टोकियोमध्ये आलेल्या कंपनीच्या अध्यक्षा अॅलिस क्वांग यांना काय हवे ते पाहण्याची आणि त्यांची सरबराई करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, बॉसची थंड वृत्ती त्याला चकित करते. तथापि, टोकियोमधील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जात असताना, बॉसचे हृदय परिवर्तन होते.
5. शाबू –शाबू स्पिरीट
दिग्दर्शक: युकू सायटो
शोझो, एक चिंतेत असणारे वडील आहेत . त्यांना आपल्या मुलीचा होणारा पती, म्हणजे भावी जावई लेकीसाठी पात्र आहे की नाही, हे पाहण्यासाठी ते एक वरपरीक्षा घेतात. त्यांची पत्नी ‘शाबू-शाबू’ जेवणासाठी एकाच स्वयंपाकाचे भांड्यात स्वैंपाक करते. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत ते एकत्र येतात.