नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त कल्याण मध्ये प्रथमच पुरूष व महिलांचे कुस्त्यांचे जंगी सामने अजिंठा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सावंत यांच्या वतीने कल्याण पश्चिमेतील रमाबाई आंबेडकर मैदानात रविवारी १५ मे रोजी संपन्न झाले.
रविवारी १५ मे रोजी कल्याण पश्चिमेतील माता रमाई आंबेडकर नगर, सम्राट अशोक चौक, एम.के. कॉलेज रोड, माता रमाई आंबेडकर उद्यानच्या बाजुला सायंकाळी ३ ते ८ वाजेपर्यंत रगंला होता. या कुस्त्यांच्या सामन्यांमध्ये पंचक्रोशीतील गावासह, नाशिक, सोलापूर, सांगली, पुणे,पालघर ठिकाणाहून कुस्तीपटू सहभागी झाले होते. यामध्ये लहान मुलांच्या २०० कुस्त्यांचा थरारासह १८ वर्षे पुढील २५० मल्लाच्या १२५ कुस्त्यांच्या थरार पाहताना उपस्थित कुस्ती शैकीनाचे डोळ्याचे पारणे फिटले.
कुस्ती मध्ये विजयी मल्लास रोख परितोषक आकर्षण ट्राफी तसेच पराभूत मल्लास आकर्षक ट्राफी अशी बक्षिस आयोजकांन कडून देण्यात आली. १८ महिला मल्ल कुस्तीसाठी मैदानात उतरल्या होत्या. त्या पैकी ६ महिला कुस्त्यांच्या थरार पाहता उपस्थित प्रषेकांची त्यांनी वाहवा मिळवली. विजेता महिला मल्ल यांस रोख रक्कम परितोषक देण्यात आले त्याच प्रमाणे पराजित महिला मल्लास देखील रोख रक्कम आकर्षक ट्राफी देण्यात आल्या. ज्या महिला मल्लास जोड न मिळाल्याने त्यांना देखीलआकर्षक पारितोषिक देण्यात आले. शेवटच्या तीन कुस्त्या बरोबरीत सुटल्या. कुस्त्यांच्या आखाड्यात ६३२ जणांनी सहभाग नोंदविला होता. चांदीची गदा ,ट्रॉफी आणि रोख रक्कम असे एकंदरीत वितरण करण्यात आले. महिलांच्या कुस्त्यांमध्ये वेदिका वाकडे हिला चित करीत दीक्षा पाटील विजेती ठरली. तर पुरुषांमध्ये गणेश केंद्रे, रितेश भगत ,पवन चौधरी हे विजयी ठरले. जयेश पाटील विरुद्ध साहिल मात्रे, पशा राऊत विरुद्ध सुधीर पाटील, अनिकेत मडवी विरुद्ध हरेश कराळे यांच्या मधील लढत बरोबरीने सोडविण्यात आली.
लहान मुले ,महिला,पुरुष ,सिंजोर, बिंजोर अशा एकूण तीनशे कुस्त्यांच्या पुढे सामने झाले. मातीतला खेळ इकडे लुप्त होत चालला असतानाच भीम जयंतीचे औचित्य साधत अजिंठा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय सावंत यांनी त्याला संजीवनी देण्याचे काम केले.
यावेळी रिपाइं नेते शाम दादा गायकवाड, सुनील खांबे, आमदार विश्वनाथ भोईर ,रमेश जाधव, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रकाश भोईर, सुरेश बारसिंग, चैनू लोखंडे, डॉक्टर महेश भिवंडीकर, कांचन कुलकर्णी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पंच म्हणून जगदीश धुमाळ, गंगाराम कारभारी,सुभाष ढोणे, गणेश पाटील, पंढरीनाम भगत, श्याम गायकर यांनी काम पाहिले