नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अद्याप तळ्यात मळ्यात सुरू असले तरी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा माजी नगरसेवकांचे सत्र मात्र कायम आहे. एकीकडे शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू असताना केडीएमसीच्या 5 माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, भाजप नगरसेविका सुनीता खंडागळे, एमआयएमच्या माजी नगरसेविका तांजिला मौलवी, शिवसेनेच्या उर्मिला गोसावी यांच्यासह फैजल जलाल यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील, निरीक्षक प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते महेश तपासे, माजी खा.आनंद परांजपे, उपस्थित होते.