नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीदिनानिमित्त आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी कल्याण पश्चिमेतील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासपुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याच प्रमाणे महापालिका मुख्यालयातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी महापौर रमेश जाधव, माजी पालिका सदस्या रेखा जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधीर मोकल, ब प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर ठाकूर ,इतर अधिकारी/ कर्मचारी वर्ग तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या डोंबिवली विभागातही अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी डोंबिवली कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि डोंबिवली विभागीय कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, फ आणि ग प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत, क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधीर मोकल, ब प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर ठाकूर, उद्यान अधीक्षक महेश देशपांडे , इतर अधिकारी/ कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.