नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – महावितरणच्या १००/२२ केव्ही मोहने उच्चदाब उपकेंद्रातून निघणा-या २२ केव्ही मोहने व मोहने १२ तसेच २५ केही बारावे उपकेंद्रातून निघणा-या २२ केही कॉलेज रोड वीज वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीच्या आणि इतर काम करण्यात येणार आहे.
यामुळे दि. ०८.०४.२०१२ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी २ या वेळेत अटाळी, वडवली, अंबिवली, मांडा.मोहनेगाव गाळेगाव, जेतवन नगर, फुलेनगर, यादवनगर, सहकारनगर, बाजारपेठ, आर.एस. टेकडी, एनआरसी कॉलनी, धम्मदीपनगर बिर्ला कॉलेज रोड, संदीप हॉटेल परिसर, भोईवाडी, आर.टी.ओ., मिलिंदनगर, केडीएमसी बी वार्ड ऑफिस परिसर, कोकणरत्न हॉटेल परिसर, गगनगिरी सोसायटी परिसर या भागाचा विज पुरवठा बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी. असे महावितरण कडून कळविण्यात आले आहे.
Related Posts