नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – बीड जिल्ह्यातील आष्टी बस स्थानकाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांनी विधानसभेत दिली.
बीड जिल्ह्यातील आष्टी बस स्थानकाचे काम लवकर पूर्ण करण्याबाबत विधानसभा सदस्य बाळासाहेब अजबे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री ॲड. अनिल परब म्हणाले, सुरूवातीला आष्टी बस स्थानकाच्या कामाला नगरपंचायतीची परवानगी मिळत नव्हती आणि त्यानंतर कोविड कालावधीमुळे बसस्थानकाचे बांधकाम बंद होते. मात्र आता हे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष बैठक देखील घेतली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशी माहिती परिवहन मंत्री ॲड अनिल परब यांनी विधानसभेत दिली.
Related Posts