नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – कारखान्यात काम करत असताना कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते.त्याचबरोबर कारखान्यातील यंत्रसामुग्री व महागडी मशिनचे नुकसान होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक असते.डोंबिवलीत फेज-२ व फेज-२ मधील अनेक कारखान्यातील सुरक्षितता कशी करावी , आग लागल्याच्या घटना घडल्यास कश्या प्रकारे उपाययोजना करून स्वतःचा जीव वाचवता येईल यावर प्रात्यक्षिकासह माहीती देण्यात आली. ५१ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ निमित्त कामा संघटना आणि औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचलनालय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या माहितीपर कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष डॉ.देवेन सोनी, उदय वालावलकर,अग्निशामक दलाचेउप अग्निशमन अधिकारीभारत घोडे, रवी गोवारी , जयेश मोरे , भारत पवार ड्रायव्हर कम ऑपरेटर केदार मराठे , सुलभ धोटेगौतम सूर्वसे यांनी माहिती दिली
औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचलनालय डेप्युटी डायरेकटर लक्ष्मीकांत गोराणे यांनी सहकार्य केले.विशेष म्हणजे कामा संघटनेच्या कार्यालयात इमर्जन्सी कन्ट्रोल सेंटर सुरू करण्यात आले असून.याबाबत सोनी यांनी उपस्थितांना माहिती दिली.ते म्हणाले, एखाद्या कारखान्यात आग लागल्याची घटना घडल्यास या सेंटर मध्ये आग विझविण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहेत.तर या कार्यालयातील संगणकावर माहिती मिळेल.आग विझविण्यासाठी गेलेल्या जवानांनाही संघटनेकडून आवश्यक सहकार्य केले जाते.