महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी देश

राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली – महाराष्ट्रात आलेल्या पूर स्थितीच्या नुकसानापोटी  केंद्रीय  आपत्ती  प्रतिसाद  निधीअंतर्गत राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या उच्चस्तरीय समितीने पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी  1,682.11 कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली.

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये वर्ष 2021 मध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी  या पाच राज्यांना  1,664.25 कोटी  आणि  पुद्दुचेरीला 17.86 कोटी  रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे.

केंद्राकडून मंजूर अतिरिक्त मदत केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मध्ये राज्यांसाठी जारी केलेल्या निधीपेक्षा अधिकचा निधी आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×