नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – ठाण्यातील मे. सूर्यदीप्त प्रोजेक्ट्स या एमएसएमई जहाजबांधणी कंपनीने भारतीय नौदलासाठी बांधलेल्या आणि एलएसएएम 20 (130 यार्ड), 11x*एसीटीसीएम बार्ज बांधणी प्रकल्पातील दारुगोळा, टोर्पेडो आणि क्षेपणास्त्राने सुसज्जित सहाव्या बार्जचे हस्तांतरण 29 एप्रिल 2024 रोजी नौदलाकडे करण्यात आले. याप्रसंगी मे. सूर्यदीप्त प्रोजेक्ट्स या जहाजबांधणी कंपनीच्या जलावतरण स्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कारंजा येथील जीएम एनएडी आयएनएएस मधुसूदन भूज यांनी भूषवले.
संरक्षण मंत्रालय आणि ठाण्यातील मे. सूर्यदीप्त प्रोजेक्ट्स या कंपनीदरम्यान 5 मार्च 21 रोजी 11 x एसीटीसीएम बार्ज(लांब, अरुंद, सपाट तळाची नौका) बांधणीचा करार झाला. या बार्जेसच्या उपलब्धतेमुळे भारतीय नौदलाच्या परिचालनविषयक वचनबद्धतेला अधिक चालना मिळेल. या बार्जमुळे जेटींच्या धक्क्यांवर तसेच बाह्य भागातील बंदरांच्या ठिकाणी भारतीय नौदलाच्या जहाजांकडे सामान/दारुगोळा यांची वाहतूक करणे आणि नौदलाच्या जहाजांवर सामान/दारुगोळा चढवणे आणि उतरवणे अधिक सुलभ होईल.
या बार्जेसची रचना स्वदेशी पद्धतीची आहे आणि त्यांची निर्मिती भारतीय नौवहन नोंदणी रजिस्टरमधील संबंधित नौदल नियम आणि नियमन यांच्या अनुसार करण्यात आली आहे. रचनेच्या प्रारंभिक टप्प्यात विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत या बार्जची नमुना चाचणी घेण्यात आली. हे बार्ज केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे गौरवशाली ध्वजवाहक आहेत.