नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तोंडावर शिवसेनेत पक्षप्रवेशाची इनकामिग जोरात चालू असल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपल्या कक्षा वेगाने विस्तारण्यास सुरुवात केली असून पालिका क्षेत्रातील हक्काच्या जागा स्वताकडे खेचण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपाच्या बलाढ्य नगरसेवकाना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले जात असून दुसरीकडे आपले अस्तित्व टिकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या नगरसेवकांना शिवसेना प्रवेशाचे वेध लागले आहेत. आज युवानेते पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवलीतील विकासकामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे,यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेवक रंजना पाटील त्यांचे पती नितीन पाटील, वृषाली जोशी त्यांचे पती रणजीत जोशी, कॉंग्रेसचे नगरसेवक रवी पाटील यांनी भगवा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला.
यापूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या चार माझी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून स्वताचे मतदार संघ सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर आणखी भाजपचे व इतर पक्षाचे किती नगरसेवक सेनेच्या वाटेवर आहेत येणाऱ्या काळात ते लवकरच दिसून येईल.