महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

प्रेयसीची क्रूरपणे हत्या करणारा प्रियकर गजाआड

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं. एकीकडे जात, पात ,धर्म आणि सौंदर्य यांच्या पलीकडे जाऊन अनेक लोक प्रेम (Love) करतात. हेच लोक पुढे जाऊन समाजातील अनेक जोडप्यांचे आदर्श बनतात. पण दुसरीकडे प्रेमाच्या नादात अनेक लोक आपला जीव गमावतात किंवा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. अलीकडच्या काळात मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार होण्याच्या असंख्य घटना रोज समोर येत आहेत. प्रेमाच्या नादात मुंबईतील एक तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.

25 एप्रिल रोजी सकाळी पूनम क्षीरसागर या 27 वर्षीय महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत चिरनेर उरण येथील जंगलातील रस्त्याच्या कडेला ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ एप्रिल रोजी एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांचा तपास सुरू होता. तपासादरम्यान उरणमधील रस्त्यावर सापडलेला मृतदेह बेपत्ता महिलेचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या प्रियकरला अटक केले.

मृत महिला पुनम क्षीरसागर हीचे आणि आरोपी निजामुद्दीन अली शेख सोबत चार वर्ष प्रेम सबंध होते. आरोपी निजामुद्दीन याचे आधीच लग्न झाले होते आणि त्याला एक मुलगाही आहे. निजामुद्दीन चे कुटुंब उत्तर प्रदेशमध्ये राहत आहे. पण तो काही वर्षांपासून मुंबईतील नागपाडा परिसरात राहत होता. मृत महिला आणि आरोपी निजामुद्दीन यांच्यात काही कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. या भांडणाने पुढे जाऊन हिंसक वळण घेतले. निजामुद्दीन याने आपली प्रेयसी पुनमची धारदार शस्त्राने हत्या केली. आरोपीने आपल्या कबुली जबाबात पोलिसांना ही माहिती दिली आहे.

उरण पोलिसांनी (Navi mumbai police) दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३०२ (हत्या) आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर निजामुद्दीन अली शेख याला अटक करण्यात आली. या घटनेत उरण पोलीस विविध बाजूंनी चौकशी करत आहेत. या हत्येत आरोपी निजामुद्दीनसोबत आणखी कोन सहभागी आहे का? याचा पोलिस शोध घेत आहे.

Translate »
×