DESK MARATHI NEWS ONLINE.
कल्याण/प्रतिनिधी – कामगारांसाठी गेल्या अनेक वर्ष्यांपासून श्रमिक जनता संघ कार्यरत आहे. आज कल्याण पश्चिमेतील लक्ष्मीनारायण मंदिराच्या सभागृहात श्रमिक जनता संघ या कामगार संघटनेचे प्रशिक्षण शिबीर पार पडले. हे शिबीर आज आणि उद्या असे दोन दिवसीय आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha patkar) यांनी उपरोक्त विधान केले आहे. पाटकर यांनी सांगितले की, आजच्या घडीला कामगारांचा संघर्ष कमजोर केला जात आहे. मालकांना सूट दिली जात आहे. देशात बेराजगारी वाढली आहे. मेनहोलमध्ये उतरुण स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत मिळवून देण्यासाठी संघटनेचे प्रयत्न केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात कामगाराच्या कुटुंबीयाला ३० लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी लढा दिला जात असल्याचे त्या म्हणाल्या.
श्रमिक जनता संघाने (Shramik janata sangh) कामगारांच्या हक्कासाठी नेहमीच आवाज उठवला आहे. त्याबद्दल मेधा पाटकर म्हणाल्या कि श्रमिक जनता संघ ही संघटना १९६६ सालापासून कामगारांसाठी काम करत आहे. महाराष्ट्रात, मध्यप्रदेशात श्रमिक जनता संघ कार्यरत आहे. टेक्सटाईल कंपन्यातही संघटना कार्यरत आहे. ‘घर बचाव, घर बनाव’ या आंदोलनातील काही कार्यकर्ते आणि सदस्य आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमातून आम्ही कायद्याचे आणि संविधानाचे प्रशिक्षण देत आहोत. दरवर्षी हा प्रशिक्षम कार्यक्रम घेतला जातो. श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेत कंत्राटी सफाई कामगारांची ७ कोटीची थकबाकी मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. हा लढा अंतिम टप्प्यत आला असून ही थकबाकीची रक्कम कामगारांना लवकर मिळणार आहे.