नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर– कर्नाटक राज्यातील हिजाब वादाचे पडसाद सोलापूर शहरातही उमटताना दिसले. एम आय एम पक्षाच्यावतीने सोलापूर शहरांमध्ये मुस्लीम महिलांनी मोठा मोर्चा काढला व कर्नाटक सरकारच्या बुरखा आणि हिजाब शाळा व कॉलेज मधील बंदी वर निषेध व्यक्त केला. हा मोर्चा सोलापूर जिल्हाधिकाऱ्यावर काढण्यात आला. दिवाळी कर्नाटक भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
कर्नाटक सरकारचा निषेध करत महिलांनी शाळा, महाविद्यालय असू दे किंवा बाजारपेठ असू दे, बुरखा आणि हिजाब घालणारच अशी कडवट प्रतिक्रिया देत कर्नाटक सरकारचा निषेध केला. बीजेपी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापुरात कोणत्याही प्रकारच्या मोर्चा किंवा आंदोलनाला परवानगी नसतानाही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कर्नाटक सरकारचा सोलापुरात निषेध करण्यात आला. कर्नाटक मधील उडपी या शहरातून हिजाब वादाला सुरुवात झाली. याचे पडसाद सोलापुरात पहावयास मिळाले. एमआयएम पक्ष्याच्या वतीने महिलांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कर्नाटक सरकारने मुस्लिम महिलांवर अन्याय करत असल्याची तीव्र भावना व्यक्त केली. यावेळी कर्नाटक सरकार आणि भाजपा सरकारचा विरोध केला. एमआयएम पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.