डोंबिवली – कळव्यात राहणाऱ्या एका महिलेने डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या धक्कादायक तक्रारीनुसार जळगावच्या भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातला आहे.
या संदर्भात कळव्यातल्या खारीगाव येथिल बाली रेसिडेन्सीत राहणाऱ्या प्रियांका योगेश राणे (33) या गृहिणीने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातल्या भडगावातील गंजेवाडा-शनि चौकात राहणारा पवन पाटील नामक इसमाच्या विरोधात भादंवि कलम 420, 406, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013 चे कलम 2 (1), (ख), 3 (1), (2) अन्वये गुन्हा दाखल केला.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर 2019 पासून आजतागायत पवन बापुराव पाटील (28) या जळगाव जिल्ह्यातील गंजेवाड्यात राहणाऱ्या भोंदूबाबाने तक्रारदार प्रियांका राणे यांच्यासह डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला असलेल्या ओम साई सोसायटीत राहणाऱ्या आईची फसवणूक केली. प्रियांका यांच्यासह त्यांचा भाऊ आणि आईला त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. साऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकु व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा काढून दाखवली. तसेच या बाबाने कुणीतरी करणी केल्याची भीती घातली. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या बाबाने आपल्या व आईचे खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये 31 लाख 6 हजार 874 रूपये इतके पैसे ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर करवून घेतले. तसेच आपल्याकडून 1 लाख 9 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या.
अशाप्रकारे या पवन पाटील याने 32 लाख 15 हजार 874 रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रियांका राणे यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वपोनि सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुरेश सरडे अधिक तपास करत आहेत.
Related Posts
-
ब्रँडेड गॉगलच्या नावाखाली ग्राहकांच्या डोळ्यात धुळफेक
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - विक्री व्यवसायात…
-
सीबीआय अधिकारी सांगून लाखोंचा गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/7IM4ud45QX0?si=V1ynIAcQX6-pbdMQ नवी मुंबई/प्रतिनिधी - सीबीआयमध्ये…
-
लाईट बिल भरण्याच्या नावाखाली आजोबांची ऑनलाईन फसवणूक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - लोकांची ऑनलाईन फसवणूक…
-
ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - साक्री तालुक्यातील दहिवेलच्या…
-
मदतीच्या नावाखाली १६ नागरिकांचे एटीएम केले रिकामे,आरोपी गजाआड
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. कल्याण/प्रतिनिधी - देशभरात दररोज फसवणुकीच्या…
-
जीएसटीच्या नावाखाली खाजगी शिक्षण संस्थेत १४ कोटी पेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार उघड
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी-गोपानीय रित्या मिळालेल्या माहितीवरून मुंबई पूर्व, येथील सीजीएसटी (CGST) आयुक्तालयाच्या विभाग – आठ(VIII) , च्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात (कोचिंग) करचुकवेगिरीचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे.मेसर्स राव एज्युसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक खासगी कंपनी राव आयआयटी अकादमी या ब्रँड नावाखाली प्रशिक्षण देण्याचे काम करते, या कंपनीने त्यांच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कावर 18% जीएसटी कर(GST)वसूल केल्याचा संशय आहे, परंतु विभागाकडे दाखल केलेल्या आयकर प्रमाणपत्रात (रिटर्न्समध्ये) या सेवा असंबंधित आणि सवलत सेवा म्हणून घोषित केल्या आहेत. अशा प्रकारे गोळा केलेले शिक्षण शुल्क कंपनीच्या बाजूने गैरवापर केले गेले असे मानले जाते. याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांपैकी एकाला सीजीएसटी (CGST) कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132(1(d) च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. संशयितांवर 14 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली सीजीएसटी(CGST) कायद्याच्या कलम 132(1(i) अंतर्गत दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सीजीएसटी मुंबई विभागाच्या जीएसटी कर फसवणुकीच्या नवीन पद्धतींचा त्वरीत शोध घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून यामुळे कर चोरी करणार्यांवर आळा बसेल
-
बनावट आधारकार्डचा वापर करून ॲमेझॉन व फ्लिपकार्टला गंडा, आरोपींना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - बनावट आधारकार्डव्दारे ॲमेझॉन…