डोंबिवली – पूर्वेकडे टिळक चौकातील आनंद शिला बिल्डींगमध्ये राहणाऱ्या विजया बाविस्कर या 58 वर्षीही महिलेची घरी एकटी असताना रात्रीस तिचा गळा दाबून जिवे ठार मारले. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत खुनी महिलेला अटक करण्यात यश मिळवले आहे. सिमा सुरेश खोपडे (40) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर महिलेच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी 5 स्वतंत्र पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली.
डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैभव चुंबळे, सपोनि प्रवीण बाकले, फौजदार अजिंक्य धोंडे, फौजदार ममता मुंजाळ, सपोनि अविनाश वणवे, फौजदार सुनील तारमळे, फौजदार संदीप शिंगटे, फौजदार कुलदीप मोरे यांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी चौकस तपास सुरू केला. या पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि खासगी गुप्तहेरांकडून माहिती मिळवली. तसेच झोपडपट्टी भागात कोम्बींग ऑपरेशन राबवून सिमा सुरेश खोपडे (40) हिला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात सहभाग असल्याने पोलिसांनी तिला अटक केली.
सीमा खोपडे आणि विजया बाविस्कर या दोघींची जुनी ओळख आहे. विजया यांच्या घरी सीमा ही रविवारी रात्री झोपण्याच्या उद्देशाने गेली. तेथे तिची नियत फिरली आणि तिने विजया यांचा गळा दाबून जिवे ठार मारले. त्यानंतर विजया यांच्या अंगावरील गळ्यातील चेन, कानातील रिंगा, अंगठी, हातातील दोन बांगड्या असे सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबूली दिली. या गुन्ह्यात आणखी कुणी आरोपी आहेत काय ? अथवा सदरचा गुन्हा काही मालमत्तेच्या वादातून झाला आहे काय किंवा कसे ? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र पोलिसांनी अत्यंत मेहनत घेऊन अहोरात्र तपास करून सदरचा गुन्हा सुमारे 24 तासांच्या आत उघडकीस आणला आहे.
मारेकरी सीमा खोपडे हिने विजया बाविस्कर हिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बाविस्कर यांचा मोबाईल टॉयलेट मध्ये टाकला होता.पोलिसांनी तपासात बाविस्कर यांचा मोबाईल हस्तगत केला आहे.
अनेक गुन्ह्यांचा तपासात पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरेची मदत मिळते असते.त्यामुळे प्रत्येक सोसायटीने आपल्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे आवाहन डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी केले