नेशन न्युज मराठी टीम.
डोंबिवली– मोटरसायकली चोरीच्या गुन्हे दाखल होताच मानपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.पोलीस तपासात मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना तर रिक्षा चोरी प्रकरणात एकाला अटक करण्यात यश आले आहे.यातील मोटरसायकल चोरटा मोटार सायकलच्या डिक्कीमध्ये मिळालेल्या आर.सी.बुकचे आधारे मोटार सायकल मालकाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करुन त्याआधारे मोटार सायकलींचे खोटे व बनावट कागदपत्रे तयार करत होता.त्यावर मुळ मालकांच्या बनावट स्वाक्षरी करुन,सदरची कागदपत्रे व मोटारसायकलचे फोटो ओएलएक्सवर टाकुन सदर बनावट कागदपत्रांचे आधारे मोटार सायकली उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून साक्षीदारांचे नावावर झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख मोहम्मद अली ( रा. मसुद प्लाझा, रूम नं. ४०२, सैनिक नगर, अलमास कॉलनी, मुंब्रा ) याला मुंब्रा येथुन मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली. शाहरूख हा त्याच्या साथीदाराच्या सहायाने मानपाडा, नारपोली, चितळसर मानपाडा व डायघर पोलीस ठाणेचे हद्दीत मोटार सायकली चोरी करायचे, चोरी केलेल्या मोटरसायकली मुंब्रा येथील सिया कब्रस्थानचे बाहेर ठेवल्या होत्या. पोलिसांनी शाहरूख कडुन एकूण पाच लाख रुपये किमतीच्या १३ मोटार सायकली जप्त केल्या. अटक आरोपीवर भादवि कलम ३७९,३४ कलमान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोटरसायकली चोरीच्या आणखी एका गुन्ह्यात पोलिसांनी युसुफ शकील अहमद खान ( ३८) याला खोणी- पलावा येथील लेकशोअर येथून अटक केली. युसुफच लॉकडाऊनमुळे फॅशन डिझाईन व्यवसाय बंद झाल्याने मोटार सायकल चोरी करायचा.चोरी केलेल्या मोटार सायकलच्या डिक्कीमध्ये मिळालेल्या आर.सी.बुकचे आधारे मोटार सायकल मालकाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करुन त्याआधारे मोटार सायकलींचे खोटे व बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर मुळ मालकांच्या बनावट स्वाक्षरी करुन सदरची कागदपत्रे व मोटारसायकलचे फोटो ओएलएक्सवर टाकुन सदर बनावट कागदपत्रांचे आधारे मोटार सायकली आर.टी.ओ.कडुन साक्षीदारांचे नावावर झाले होते.त्याच्यावर भादंवि ४२०,४६५, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून १,६०,००० रुपये किमतीच्या चार मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सिध्देश सुनिल मांढरे (रा. ए/०७, गणेश भवन चाळ, रेतीबंदर रोड, म्युनसिपल ऑफिसजवळ, उमेश नगर, डोबीवली पश्चिम ) याला मानपाडा पोलिसांनी रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या.त्याच्यावर भादविक ३७९,३४ कलमान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अटक आरोपीकडून पोलिसांनी ७० हजार रुपये किमतीची एक रिक्षा जप्त केली आहे.
मानपाडा पोलिसांन १० गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले असून उर्वरीत मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडे, सपोनिरीक्षक अनिल भिसे, पोउनिरीक्षक सुनिल तारमळे, पोलीस हवालदार सुधीर कदम सोमनाथ ठिकेकर, पोलीस नाईक प्रशांत वानखेडे, संजु मासाळ, अशोक कोकडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, सुधाकर भोसले, /तारांचद सोनवने, शांताराम कसबे, पोलीस शिपाई अशोक आहेर, सोपान काकड यांनी अथक मेहनत घेतली