नेशन न्युज मराठी टीम.
अलिबाग – रोहा वनविभागांतर्गत महाड वनपरिक्षेत्र येथील (दि.08 जानेवारी 2022) रोजी मौजे टोळ बुद्रुक, महाड येथे वनक्षेत्रपाल भोर, वनक्षेत्रपाल महाड व कर्मचारी यांच्या संयुक्त टीमने उप वनसरंक्षक रोहा व सहा.वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे टोळ बुद्रुक, महाड येथे सापळा रचून अवैधरित्या विक्री करीत असताना जिवंत खवले मांजर-1, रानडुक्कर सुळा-1, व संशयित पावडर एकूण तीन मोटार सायकल क्रमांक MH- 11 CF 6804, MH-12 AG 2131 व MH-०६ BY 6290 मुद्देमालासह पकडण्यात आले असून त्याच्यांविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9,39,(अ) 39 (2) (3),44(1),(4)51 मुंबई वन्यजीव संरक्षण अधिनियम 1951 चे कलम 1 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे
मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडील दि.09 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशानुसार या प्रकरणी आरोपीस दि. 13 जानेवारी 2022 पर्यंत वनकोठडी (F.C.R.) देण्यात आली आहे. पकडण्यात आलेले जिवंत खवले मांजर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणीनंतर वनअधिकारी व कर्मचारी यांनी 10 जानेवारी 2022 रोजी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपासाची कार्यवाही सुरु आहे.
या प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपीची नावे सुनिल भाऊ वाघमारे रा.भेलोशी, ता.महाड, जि. रायगड, सतीश कोंडीराम साळुंखे, रा.कुंभेशिवथर, ता.महाड, जि.रायगड, सुरज संतोष ढाणे, रा.निनामपाडळी, ता.जि.सातारा, देविदास गणपत सुतार रा.टोळ खुर्द, ता.माणगाव, जि.रायगड, शुभम प्रशांत ढाणे, रा.निनामपाडळी, ता.जि.सातारा ही आहेत, अशी माहिती रोहा वनविभागाचे उप वनसंरक्षक श्री.अप्पासाहेब निकत यांनी दिली आहे.