नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण – दिनांक 10 जानेवारी 2022 पासून हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रिकॉशन (बूस्टर ) डोस देण्यात येणार आहे, त्याकरिता खालील तक्त्यात दिल्यानुसार ( सकाळी 10 तेसायं5.00* ) लसीकरण केंद्र सुरु असतील.
- हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना दिनांक 10 जानेवारी 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात येईल संबंधित लाभार्थ्याचे दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले असावेत.
∆ सर्व हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा कमी आहे आणि सिटीझन या प्रवर्गात दुसरा डोस घेतला असेल अशा लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोससाठी पात्र होण्यासाठी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, अशा व्यक्तींचे लसीकरण फक्त शासकीय लसीकरण केंद्रावर ऑनसाईट पद्धतीने उपलब्ध असेल. - 60 वर्ष वा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने दिनांक 10 जानेवारी 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात येईल. प्रिकॉशन डोस घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्याचे दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असावेत आणि त्यांना त्यांच्या डॉक्टराचे परवानगी असलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.*
- सर्व नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी विनामूल्य लस देण्यात येईल.
- प्रिकॉशन डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कोविन अँपमध्ये नोंदणी आणि ऑनस्पॉट वॉक- इन सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे
Related Posts