नेशन न्युज मराठी टीम.
डोंबिवली – मुजफ्फरनगर येथील सेमिनार मध्ये हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब याने केस कापताना पाणी नसेल तर केसांवर थंकून केस कापा असा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हबीब याने अशी कृती केल्याने नाभिक समाज प्रचंड संतापलेला आहे. डोंबिवलीतील नाभी समाज संघटनेने हबीबचा जाहीर निषेध करून त्याच्या गैरकृत्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.त्याने केलेल्या किळसवाण्या कृत्याचा नाभिक समाज संघटनेने काळ्या फीत लावून निषेध व्यक्त केला.
डोंबिवली पूर्वेकडील स.वा.जोशी शाळेजवळील संघटनेच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध नोंदविला.संघटनेचे अध्यक्ष राऊत म्हणाले, हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब याने असे कृत करून समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.हबीबवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे. तर सचिव पोखळे म्हणाले, नाभीक समाजासाठी ग्राहक हा देवासारखा असतो.हबीब याने एका ग्राहकाचे केस कापताना त्याच्या डोक्यावर थुंकणे हे अपमानास्पद आहे.अशा सेमिनारवर पोलिसांनी बंदी आणावी. अशीही मागणी संघटने कडून या वेळी करण्यात आली.
यावेळी नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत, सचिव मंगेश पोखळे, खजिनदार बाळा पवार, सहखजिनदार तुषार शिंदे, विश्वस्त दशरथ चित्ते, सोमनाथ वरपे, संतोष शर्मा, शैलेंद्र वखरे, भरत भाहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.