नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण – ताप ,सर्दी , अथवा खोकला लक्षणे असल्यास त्वरित कोरोना चाचणी करा असे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केले असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही आवाहन आयुक्त सूर्यवंशी यांनी केले आहे .
केडीएमसी क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवशी यांनी मागील तीन दिवसांपासून तज्ञ डॉक्टर वर्गाच्या ऑनलाइन बैठका घेत आहेत .पत्रकारांशी बोलताना त्यांनी सागितले की , रुग्ण संख्या वाढत असल्याचे खरे असले तरी आमची यंत्रणा सज्ज आहे . नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही नागरिकानी जास्तीत जास्त लसीचे दोन डोस पूर्ण करा आणि तसेच ताप , सर्दी , खोकला ही लक्षणे असल्यास त्वरित चाचणी करा , घाबरून जाण्याची गरज नाही , घरी राहून ही उपचार घेऊ शकता , घरात जागा नसेल तरच त्यांना पालिकेच्या कोव्हिडं सेंटर मध्ये उपचार घेऊ शकता अन्यथा आपला उपचार घेई राहून सुद्धा घेता येऊ शकतो. दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आवाहनही या वेळी पालिका आयुक्त यांनी केले
यावेळी कोरोना बाधिता मध्ये गरोदर महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त प्रमाणात आहे तरी नागरिकांनी घाबरून न जाता , चाचणी करून उपचार घ्या , गरोदर महिला आणि लहान मुले आणि अन्य कोरोना बाधित रुग्णाची धावपळ होणार नाही याची काळजी डॉक्टर वर्गाने घ्यावी. असेही या वेळी आयुक्त यांनी सागितले