नेशन न्युज मराठी टीम.
डोंबिवली – अखेर त्या वादग्रस्त डोंबिवली दत्तनगर परिसरातील अनधिकृत इमारतीवर पालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरातील तळ+5 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कसनाची कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार प्रभागक्षेत्र ग अंतर्गत दत्तनगर डोंबिवली पूर्व, येथील विकासक प्रफुल्ल गोरे यांच्या शिव दत्तकृपा या तळ + 5 मजल्याच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम रहिवास मुक्त करून काल निष्कासनाच्या कारवाईस सुरूवात करण्यात आली. हि निष्कासनाची कारवाई रामनगर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी सचिन सांडभोर व पोलिस कर्मचारी , अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली.
कारवाई दरम्यान तेथील रहिवाशांनी प्रचंड विरोध केला,पोलिसांनी सर्व रहिवाशाना इमारती बाहेर काढत कारवाई करण्यास सुरवात केली. अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे या साठी पालिका प्रशासनाचे कौतुकच आहे पण जर पालिका प्रशासनाने अशी अनधिकृत बांधकामे निर्मितीच्या वेळीच कारवाई केली तर यात सामान्य नागरिक भरडला जाणार नाही. अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.