नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण– मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानक जवळील पूर्व पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल एम आर व्ही सीच्या माध्यमातून सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला असून त्याचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .हा पूल झाल्याने नागरिकानां मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढल्याने नागरिक रेल्वेला दुवा देतील तर रेल्वे समस्या बाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगत कल्याण मध्ये टक्केवारी आणि श्रेयावरून वाद नेहमी सुरू असल्याची टीका मनसे आणि शिवसेनेवर करत असताना पाटील पुढे म्हणाले की , जनतेला माहीत आहे कोण काम करत आहे कोण नाही , राजकीय नेत्याना आवाहन आहे की सर्वांनी एकत्र येऊन जनतेचे काम करा असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले .
नितेश राणे प्रकरण बाबत केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले की , घाणरडे राजकारण करणे उचित नाही , एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या गोष्टीशी असेल तर कायदा सर्वांसाठी समान आहे , परिस्थिती निर्माण करून भाजपाचा आहे म्हणून म्हणून कुणाला अटकावायचे उचित नाही सत्ता आहे म्हणून दुरुपयोग करू नका असे आवाहन कपिल पाटील यांनी केले .
भाजपा मधील नगरसेवक अथवा कार्यकर्ता अन्य पक्षात जाणार नाही , अनेक ऑफर येतात मात्र आमचा कार्यकर्ता स्वाभिमानी असल्याने विकास आघाडीच्या खिचडीमध्ये जाणार नसल्याचा दावा यावेळी पाटील यांनी केला .
भिवंडी ते कल्याण मेट्रो सुधारीत अथवा जुना डीपीआर प्रमाणे कामाला सुरुवात करावी अशी मागणी यावेळी पाटील यांनी करत जनतेने आता शिवसेनेला सवाल करावा या कामाला का वेळ लागत आहे .आणि मेट्रो झाल्यास सर्व सामन्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे पाटील यांनी मत व्यक्त केले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे , माजी आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते