नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण – कल्याण कोळशेवाडी पोलीसानी एका सराईत चोरट्याला सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत अलिहसन जाफरी अस या सराईत चोरट्याचे नाव आहे . तो 22 वर्षाचा असून आलिहसन हा सराईत गुन्हेगार आहे .चैन स्नेचिंग दुचाकी चोरी मध्ये हा तरबेज गुन्हेगार आहे .चैन स्नेचिंग करण्यासाठी तो आधी महागड्या दुचाक्या चोरायचा त्यानंतर या चोरलेल्या दुचाकीवरून चैन स्नेचिंग करायचा ही दुचाकी रस्त्यात उभी करून तेथून पळ काढायचा .
कल्याण कोळशेवाडी परिसरात चैन स्नेचिंग ,दुचाकी चोरीच्या घटनान मध्ये वाढ होत होती. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी चार पथके नेमली व या चोरट्यांचा शोध सुरु केला .खबऱ्यां मार्फत त्यांना अलीहसन हा आंबिवली इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा लावून अलीहसनला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पाच मोटरसायकल तीन साखळ्या 4 लाख 53 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. आतापर्यंत कल्याण-डोंबिवली भिवंडी , ठाणे मुंबई या ठिकाणी देखील चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.