कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वाहनाची ई चलन थकबाकी असेल तर ती त्वरित भरा अन्यथा पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागेलं असा इशारा कल्याण वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिला आहे .कल्याण सहित राज्यात अनेक ठिकाणी वाहतुकीची नियम मोडणाऱ्या ई चलन द्वारे दंड पाठविण्यात आला असून तो अनेकांनी न भरल्याने कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून ती वसुली करण्यासाठी कल्याण वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
कल्याण वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या पथकाने कल्याण शहरात ई चलन थकबाकी करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात धडक कारवाई केली .2 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2021 या काळात 8 हजार 665 वाहनावर कारवाई करत 9802 केसेस केल्या असून सुमारे 11 लाख 31 हजार 850 रुपये विक्रमी दंड वसूल केला आहे .दरम्यान वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले की , ई चलन थकबाकी मोठ्या प्रमाणात असून वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार कल्याण मध्ये विशेष मोहीम राबवत 11 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे .यात दुचाकी , तीन चाकी आणि कार च्या चालकांनी विविध नियम मोडल्याने त्यांच्यावर ह्या कारवाई करण्यात आली आहे . वाहन चालकांना आवाहन आहे की ई चलन थकबाकी त्वरित भरा , अनेक थकबाकीदाराना मेसेज , इमेल द्वारे नोटीस बजावण्यात आल्या असून ही थकबाकी न भरल्यास अश्या थकबाकीदारांना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे 11 डिसेंबर लोक अदालत आयोजन केलेले आहे तत्पूर्वी 10 डिसेंबर पर्येंत थकबाकी भरण्याचे आवाहन वाहतूक शाखे कडून करण्य्हात येत आहे.