कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनायभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .चेहऱ्यावर ऍसिड टाकण्याची धमकी व सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप करत एका पीडित तरुणीने केडीएमसीचे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांच्या विरोधात कल्याणच्या बाजार पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . त्यानंतर संदीप गायकर फारार होता. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती .
संदीप गायकर कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजर झाला असता त्याला बाजारपेठ पोलिसांनी अटक करून आज पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर केले असता .न्यायालयाने संदीपला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .संदीपच्या अटकेने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.
- November 30, 2021