डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या वर्षभरापासून बेकायदा बांधकामाबाबत लोकशाही मार्गाने सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे आंदोलन करत आहेत शनिवारी निंबाळकर यांनी डोंबिवली विभागीय कार्यालय बाहेरील प्रवेशद्वाराजवळ अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन केले.’ काव काव आयुक्त आव’, ‘अधिकारी आव’, ‘अतिरिक्त आयुक्त आव’,’रेती खाऊ, सिमेंट खाऊ आणि पैसे खाऊ’अशा प्रार्थना करून उपहासात्मक टीका केली.
27 नोव्हेंबर 2020 पासून ते 27 नोव्हेंबर 2021 तारखेपर्यंत ( सलग 365 दिवस ) सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त, सहा. आयुक्त, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शांततेने आंदोलन करत आहेत. आज आंदोलनाचे वर्षपूर्ती निमित्त केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालयाबाहेर आयुक्त आणि सहा. आयुक्तांचे विरोधात श्राद्ध घालत, पिंडदान करत अनोखे आंदोलन केले. निंबाळकर यांनी या प्रकारांना वाचा फोडण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचे 365 दिवस उलटून गेले तरीही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने आरोप निंबाळकर यांनी केले आहे.
डोंबिवली मधील सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे गेले वर्षाभर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या केडीएमसी अधिकाऱ्यांच्या विरोधात गेले वर्षभर लढा देत आहेत. मात्र आयुक्तांकडे अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्याना कोणतेही उत्तर मिळाले नाही, ना केडीएमसीला अनधिकृत बांधकाम रोखण्यात यश आलं आहे. त्यामुळे अखेर आज 365 दिवस आंदोलनाचे पूर्ण होताच निंबाळकर यांनी पिंडदान करत, पालिकेचे वर्षश्राद्ध घालत महापालिकेच्या निषेधार्थ आंदोलन केले आहेत.