नागपूर/प्रतिनिधी – महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सात डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. याबाबतच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी आज सर्व संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे.नागपूर येथे विधानभवनातील मंत्रीपरिषद दालनात प्रधान सचिव श्री.भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर , नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांसह विविध संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.महाराष्ट्र विधान परिषद सभापतींचे सचिव म. मु. काज, उपसचिव राजेश तारवी,अवर सचिव रविंद्र जगदाळे, महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल महाजन, विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा व सचिव सुनील झोरे, विधान भवनाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, विधीमंडळाचे पध्दती विश्लेषक अजय सर्वणकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
मुंबई येथे पुढील आठवड्यात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे.त्यादृष्टीने आजच्या बैठकीत अनुषंगिक तयारीसाठी सर्व विभागाने केलेल्या प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला. यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल. त्यामुळे विधीमंडळ सदस्य, त्यांचे स्वीय सहायक, सर्व अधिकारी-कर्मचारी, वृत्तसंकलनासाठी येणारे माध्यम प्रतिनिधी, सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस, राज्यभरातून येणारे वाहन चालक या सर्वांच्या आरटीपीसीआर टेस्ट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची महत्त्वपूर्ण सूचना श्री. भागवत यांनी आरोग्य विभागाला आज केली.
कोरोना पार्श्वभूमीवर मर्यादित प्रवेश राहील. त्यामुळे विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठीची आवश्यक व्यवस्था परिसरात करण्यात यावी. याशिवाय सभागृहामध्ये ‘सोशल डिस्टंसिंग’ राखायचे असल्यामुळे सदस्यांना एक आसन सोडून बसण्याची व्यवस्था लक्षात घेता यावेळी अभ्यागतांना कामकाज बघण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही.तत्पूर्वी, विधिमंडळ परिसरात सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सर्वप्रथम चर्चा झाली. विधिमंडळ परिसरात नवीन इमारत कार्यान्वित झाली आहे. या इमारतीसाठी आवश्यक असणारी सुरक्षा व्यवस्था व अनुषंगिक उपाययोजना करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यासोबतच विधान भवन, विधान भवनाबाहेर परिसर, आमदार निवास, रविभवन, 160 खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार निवास या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतचे निर्देश देण्यात आले.
आमदार निवासामध्ये महिला आमदारांसाठी एक मजला राखीव ठेवण्यात यावा व विशेष पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, असे निर्देशित करण्यात आले.अधिवेशन काळात करण्यात आलेल्या वाहन व्यवस्थेबाबत तसेच पार्किंग व्यवस्थेबाबत सूचना करण्यात आल्या. दूरध्वनी व्यवस्था, वाहन व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा, अहोरात्र वैद्यकीय सुविधा, नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन दलाची उपलब्धता, विनाअडथळा इंटरनेट, वाय-फाय सुविधा, रेल्वे आरक्षण, खानपान व्यवस्था, अन्नपदार्थ व पेय यांची तपासणी तसेच उत्तम स्वच्छता या संदर्भातही सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा करण्यात आली.
Related Posts
-
आयआरसीटीसीतर्फे बाबासाहेब आंबेडकर विशेष यात्रा पॅकेज
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘देखो अपना देश’…
-
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
मुंबई/प्रतिनिधी - कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी…
-
केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविण्यास मान्यता
मुंबई /प्रतिनिधी- मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही…
-
माजी सैनिक पाल्यांच्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्जाबाबत आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मुंबई जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांना…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
अनाथ उमेदवारांना महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर विशेष प्राधान्य
प्रतिनिधी. मुंबई - अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय…
-
बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
मार्कोस - यूएसएन सील यांचा संयुक्त विशेष सैन्य सराव गोव्यात सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - 'संगम' या भारतीय नौदलाचे मार्कोस…
-
नागपूर मध्ये ४२ लाखाचा २११ किलो गांजा जप्त
नेशन न्यूज मराठी टिम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर मधील महसूल गुप्तचर…
-
१२ डिसेंबरपासून दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस…
-
जिल्हा वार्षिक नियोजन निधीच्या माध्यमातून पोलीस विभागाचे बळकटीकरण
अलिबाग/प्रतिनिधी- जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्कॉर्पिओ,…
-
यवतमाळ अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या बनविण्याचे नियोजन
प्रतिनिधी . यवतमाळ, दि. २३ - पुजा करतांना देवासमोर लावण्यात…
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत…
-
शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम सुरु
नाशिक/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान…
-
नागपूर फ्लाइंग क्लबला डीजीसीएची मान्यता
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची…
-
भारतीय रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लाखो भारतीय…
-
ट्रायचे “राष्ट्रीय प्रसारण धोरण” तयारीसाठी सल्लामसलत दस्तऐवज जारी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - माहिती…
-
मराठा आरक्षण हा विषय संसदेच्या विशेष अधिवेशनात घ्या- विद्या चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - राज्यात गेल्या…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
अम्मा अरियन चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ…
-
२५ फेब्रुवारीपासून नागपूर येथे दोन दिवसीय महसूल परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर- नागपूर विभागातील महसूल अधिकाऱ्यांसाठी येथे 25 आणि 26 फेब्रुवारीला महसूल…
-
पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांत होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
शाहीर पियुषी भोसले हिचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा/प्रतिनिधी - शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब…
-
महिला विकासाच्या योजनांसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष
मुंबई - महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून महिला विकासाच्या योजना…
-
नागपूर मध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच…
-
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे विशेष कॅम्प लावण्याची युवासेनेची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्य सरकारकडून राज्यातील कॉलेजेस पुन्हा सुरू करण्याचा…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र…
-
नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था…
-
विशेष लोक अदालतीत मोटार अपघाताची १३०प्रलंबित प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्ह्यातील प्रलंबित मोटार अपघात…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची डीएनए टेस्ट करणार - पोलीस आयुक्त, नागपूर
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - मध्यप्रदेशाच्या हरदा…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
भरड धान्याबाबत जनजागृतीसाठी इंडिया टुरिझमचा विशेष उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने …
-
सोलापूर वरून सोळाशेहून अधिक नागरिक विशेष रेल्वेने लखनौस रवाना
प्रतिनिधी . सोलापूर - लॉकडाऊनमुळे व जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील 1632…
-
नागपूर जिल्ह्यातील ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
नेशन न्यूज मराठी टिम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची…
-
पावसाळी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागु
प्रतिनिधी. ठाणे - ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या…
-
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे,…
-
टपाल कार्यालयांमधून राखी साठी विशेष लिफाफ्यांची विक्री
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - रक्षा बंधन हा…
-
आदिवासी बांधवांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र देण्याकरिता विशेष मोहीम
नाशिक/प्रतिनिधी - आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी समाजासाठी वैयक्तिक आणि सामूहिक…
-
ठाणे जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीयपंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
-
मुंबईत फ्लेमिंगो’पक्ष्यांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या…
-
केडीएमसी क्षेत्रात बालकांसाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण अभियान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यातील काही भागात…
-
मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - तृतीयपंथी हा देखील समाजाचा…
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७…
-
नागपूर येथे ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनला सुरुवात
नागपूर/ प्रतिनिधी - मुंबई पाठोपाठ नागपूर येथे डॉ.नितीन राऊत यांच्या…
-
वाढत्या सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष जनजागृती मोहीम
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - वाढत्या सायबर गुन्ह्याला आळा…