मुंबई/प्रतिनिधी – कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाट्यगृहांचे नियमन केले जाईल.
नाट्यगृह / रंगभूमीची परिवास्तू (देखाव्यांसहित)सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल. नाट्य कलाकारगण आणि कर्मचारी यांनी नियमितपणे त्यांची स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सर्व देखाव्यांची व कलाकारांसाठी असलेल्या कक्षांची दररोज धूम्र फवारणी करणे आवश्यक राहील. देखावे, प्रसाधनगृहे आणि रंगभूषा कक्ष यांच्या नियमित स्वच्छतेबाबत वेळापत्रक आखावे, स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. मुखपट्टया आणि मुख संरक्षक कवच (फेस शिल्ड) लावणे बंधनकारक आहे, आणि नाट्य कर्मचारीवृंदाला हात स्वच्छ करण्यासाठी निर्जंतुक द्रव उपलब्ध करून द्यावे. कोणत्याही अतिथींना-मग ते कोणीही असोत- कलाकारांच्या कक्षांमध्ये जाण्यास अजिबात परवानगी दिली जाणार नाही. ज्या कोणाकडून, जी साधने (संगीत व्यवस्था / लॅपटॉप / माईक / प्रकाश योजना इत्यादी) हाताळली जातील त्यांनीच ती वापरावीत, याबाबत दक्षता घेण्यात यावी. नाट्यगृहांची नियमितपणे स्वच्छता/ निर्जंतुकीकरण / धूम्र फवारणी, इत्यादी करण्यासाठी, सर्व नाट्यगृह व्यवस्थापनांनी उपाययोजना करणे बंधनकारक आहे.
कोणत्याही अतिथीस, नाटकाच्या प्रयोगापूर्वी किंवा प्रयोगानंतर कलाकाराला किंवा इतर नाट्य कर्मचारीवर्गाला रंगमंचावर / कलाकारांच्या कक्षांमध्ये जाऊन भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. रंगभूषाकाराने सत्रापूर्वी आणि सत्रानंतर त्याचे हात साबणाने / निर्जंतुक द्रवाने (Sanitizer) धुतले पाहिजेत. रंगभूषेच्या रंगाचे मिश्रण, वापरल्यानंतर फेकून देता येण्याजोग्या रंगपाटीवर करावे आणि शक्यतो, प्रत्येक अभिनेत्यासाठी केवळ एका ब्रशचा रंग लावण्याच्या साधनाचा वापर करावा. शक्यतो प्रत्येक अभिनेत्यासाठी, ब्रश / कंगवे वेगळे राखून ठेवावेत, जेणेकरून एकमेकांचे ब्रश / कंगवे दूषित होणार नाहीत. केसांचे ब्रश व कंगवे आणि पुन्हा वापरता येण्याजोगे रंगभूषेचे ब्रश योग्य निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ करण्यात यावेत. अभिनेत्याने (अभिनेत्यांनी त्यांची स्वत:ची रंगभूषा / केशभूषा स्वतःच करून येण्याबाबत विचार केला जावा. व्यक्ती व्यक्तींच्या संपर्काच्या दरम्यान केशभूषा व रंगभूषा करताना, व्यक्तिगत संरक्षक साधने (पीपीई) व अशी सूचना देण्यात येत आहे. रंगभूषाकार किंवा केशभूषाकार यांनी मुख संरक्षक कवच (laco-shields) लावले पाहिजे. रंगभूषा कक्ष किमान 6 फुट दूर असला पाहिजे. वापरल्यानंतर फेकून देता येण्याजोग्या रंगभूषा संचाचा आणि ब्रशचा वापर करण्याची आणि प्रत्येक वापरानंतर त्या संचाची विल्हेवाट लावण्याची सूचना देण्यात येत आहे. प्रत्येक वापरापूर्वी आणि वापरानंतर सर्व ध्वनी व प्रकाश योजनेच्या सामग्रीचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.सर्व कलाकारांनी स्वतःच्या आरोग्याची स्वतःच देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत क्रमांकांवर (हेल्पलाईन) कळवावे.
प्रेक्षागाराबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे.नेहमी तोंडाला मुखपट्टी(मास्क) बांधणे /कपड्याने तोड झाकणे (मुखावरण लावणे) अनिवार्य आहे. परिवास्तुच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये हात स्वच्छ करण्यासाठी, प्राधान्याने हाताचा स्पर्शरहित पद्धतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव उपलब्ध ठेवावे. श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना/ शिंकताना प्रत्येकाने स्वतःचे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रुमालाने / कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. सर्वांनी स्वताच्या आरोग्याची स्वतःच देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत क्रमांकांवर (हेल्पलाईन) कळवावे. थुंकण्यास सक्त मनाई असेल.
आरोग्य सेतू उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकाराव्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्यदृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविङ प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील.
प्रवेश द्वारांचर कर्मचाऱ्यांची/भेटी देणाऱ्यांची तापमान तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच केवळ परिवास्तूत प्रवेश करण्याची मुभा देण्यात येईल. सर्व प्रवेश द्वारांवर आणि कार्यक्षेत्रामध्ये हात निर्जंतुक करण्याची सोय उपलब्ध करण्यात यावी. प्रेक्षागाराच्या आणि परिवास्तूच्या प्रवेशाच्या आणि निर्गमनाच्या ठिकाणी प्रेक्षकांकरिता रांगेसाठी आखीव खुणा करण्यात येतील. गर्दी होऊ नये म्हणून, लोकांना, एकमेकांमध्ये अंतर ठेवून रांगेने बाहेर सोडण्यात यावे. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये विविध पडद्यांवर तसेच एकल पडद्यावर लागोपाठच्या प्रदर्शनांच्यामध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात येईल, जेणेकरून प्रेक्षक रांगेतून, एकमेकांमध्ये अंतर ठेवून आत जाण्याची, बाहेर पडण्याची सुनिश्चिती करता येईल. गर्दी टाळण्यासाठी एकापेक्षा अधिक प्रवेश व निर्गम द्वारे वापरण्यात यावीत.
नाट्यगृहांचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही. नाट्यगृहांच्या प्रेक्षागारामधील आसन व्यवस्था ही पर्याप्त सुरक्षित अंतर राखले जाईल अशा प्रकारे केली असली पाहिजे. जोडपत्र एक मध्ये आदर्श आसन व्यवस्थेचा नमुना दिलेला आहे. तिकीट आरक्षणाच्या वेळी (ऑनलाईन आरक्षणाच्या आणि तिकीट खिडकीवरील तिकिटांच्या विक्रीच्या, अशा दोन्ही वेळी), जी आसने वापरावयाची नसतील त्यावर “आसनांचा वापर करू नये” अशी स्पष्ट खूण करण्यात येईल.
नाट्यगृहांमध्ये “आसनांचा वापर करू नये” अशी खूण केलेल्या आसनांचा लोकांनी वापर करू नये म्हणून, त्यांवर एकतर फित लावण्यात येईल किंवा फ्लोरोसेंट मार्करने खूण करण्यात येईल, जेणेकरून नेहमीच पर्याप्त सुरक्षित अंतराची सुनिश्चिती होईल.
वाहनतळ परिसरातील आणि परिवास्तूच्या बाहेरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करताना, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन केले जात असल्याची सुनिश्चिती करण्यात येईल\उद्वाहनांमध्ये सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन करून, लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात येईल. मध्यंतरामध्ये सामाईक जागा, वऱ्हांडे (लॉबी) आणि प्रसाधनगृहे या ठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. प्रेक्षकांनी मध्यंतरामध्ये ये-जा करणे टाळावे याकरिता. त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. प्रेक्षागारातील वेगवेगळ्या रांगांमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना एकमेकांमध्ये अंतर राखून ये-जा करता यावी याकरिता दीर्घकाळाचे मध्यंतर ठेवता येईल.
तिकिटे देणे/त्यांची पडताळणी करणे/त्यांची रक्कम भरणे यांकरिता तसेच, खाद्य पदार्थ व पेये यांकरिता ऑनलाइन आरक्षण, इ-वॉलेट, क्यूआर कोड स्कॅनर, इत्यादींसारख्या डिजिटल संपर्करहित व्यवहारांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे. संपर्काचा (व्यक्तीचा शोध घेणे सुकर व्हावे म्हणून. तिकीट आरक्षण करतेवेळी संपर्क क्रमांक नोंदवून घेण्यात येईल. तिकीट कार्यालयात बॉक्स ऑफिस) तिकीट खरेदी दिवसभरासाठी सुरू ठेवण्यात येईल. तसेच तिकीट विक्री खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकीट आरक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्यक्षात खिडकीवर तिकीट काढतेवेळी गर्दीला आळा घालण्यासाठी पर्याप्त सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे पालन करून, तिकीट कार्यालयात पुरेशा प्रमाणात खिडक्यांची व्यवस्था करण्यात येईल. तिकीट कार्यालयात रांगेचे व्यवस्थापन करताना, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने जमिनीवर खुणा (फ्लोअर मार्कर्स) करण्यात येतील.
संपूर्ण परिवास्तू, सामाईक सुविधा यांचे तसेच लोकांकडून सामाईकपणे हाताळल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी, जसे की, दांडे(handles), कठडे (railing) इत्यादींचे वारंवार
निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल. प्रत्येक नाट्य प्रयोगानंतर प्रेक्षागाराचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. तिकीट कार्यालय, खाद्य-पेयपदार्थ विक्री स्थळे, कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक चीजवस्तूंचे खण, स्वच्छतागृहे, सार्वजनिक जागा आणि अंतर्गत कामकाज पाहणारे कार्यालय (back office) क्षेत्रे यांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण केल्याची खात्री करण्यात येईल.निर्जंतुकीकरण करणाऱ्या कर्मचारीवर्गाच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजण्यात येतील. जसे की, हातमोजे, बूट, मुखपट्टया, व्यक्तिगत संरक्षक साधने (पीपीई) इत्यादींच्या संयुक्तिक वापरासाठी पर्याप्त तरतुदी करण्यात येतील.कोणतीही व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास, परिवास्तुचे निर्जंतुकीकरण हाती घेण्यात येईल.
कामाच्या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मुखावरण (फेस कव्हर) लावणे बंधनकारक असून अशा मुखावरणाचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा. वयस्क कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी व वैद्यकीय उपचाराधीन कर्मचारी अशा, अधिक जोखीम असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी जास्त खबरदारी घ्यावी. अशा कर्मचाऱ्यांना लोकांशी थेट संपर्क आवश्यक असणारी व लोकांसमोर जावे लागणारी कामे विशेष करून देण्यात येऊ नयेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने अधिकाधिक सजग राहण्याचा भाग म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये (मोबाईल) आरोग्य सेतू अॅप स्थापित करून अद्ययावत केले असल्याची नियोक्त्यांनी खात्री केली पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांकडून स्वत:च्या आरोग्याची स्वतःच देखरेख केली जात असल्याची आणि कोणताही आजार झाल्यास त्याबाबत तात्काळ कळवले जाण्याची खात्री करण्यात यावी.
प्रमुख प्रवेश द्वारे, ऑनलाईन, डिजिटल तिकीट विक्री ठिकाणे, तसेच प्रसाधनगृहे व हांडे (लॉबी), यांसारखी सार्वजनिक ठिकाणे येथे काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सूचना लावण्यात येतील. परिवास्तूच्या आत आणि बाहेर मुखपट्टी लावणे, सुरक्षित अंतर राखणे व हातांची स्वच्छता राखणे यांबाबतच्या लोकोपयोगी घोषणा तसेच घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजना यासंबंधातील विनिर्दिष्ट घोषणा ह्या नाट्य प्रयोगापूर्वी. मध्यंतरामध्ये आणि नाट्यप्रयोगाच्या शेवटी करण्यात येतील. वरील ठिकाणांच्या बाहेरील बाजूस व आतील बाजूस ठळकपणे, कोविड-१९ च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरील भित्तीपत्रके/ उभे फलक/ ध्वनीफित वाजविण्यासाठी तरतुदी केल्या गेल्याच पाहिजेत. कोविड- 19 संदर्भातील जनजागृतीकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून “माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे संदर्भातील ध्वनीफित प्रयोगापूर्वी व मध्यतरांत वाजविण्यात याव्यात.
वातानुकूलनासाठी/ वायुवीजनासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करण्यात येईल, ज्यांमध्ये, इतर गोष्टींबरोबरच पुढील बाबींवर भर दिलेला आहे. सर्व वातानुकूलन उपकरणाचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. सापेक्ष आर्द्रता ही ४० ते ७० टक्क्यांच्या मर्यादेत असली पाहिजे. शक्य होईल तितक्या प्रमाणात ह्याचे पुनर्चक्रण टाळण्यात यावे. शक्य होईल तेवढी, ताजी हवा मिळण्याची व्यवस्था असली पाहिजे. समोरासमोरील वायुवीजन हे पुरेशा प्रमाणात असले पाहिजे.
कोविड १९ च्या संबंधातील लक्षणे किंवा बेफिकिर वर्तन यांबाबत प्रेक्षागार व्यवस्थापकाच्या/व्यवस्थापकांच्या आणि स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या समन्वयाने काटेकोरपणे कार्यवाही करण्यात येईल. खाद्यपदार्थ नागविण्यासाठी, शक्य तितका, नाट्यगृह उपयोजक (थिएटर अॅप) / शीघ्र प्रतिसाद संकेतांक (क्यू.आर. कोड) इत्यादींचा वापर करण्यास ग्राहकांना प्रोत्साहन देण्यात येईल. खाद्य व पेय पदार्थाच्या क्षेत्रामध्ये शक्य असेल तेथे तेथे अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत.प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित अंतर राखण्यासाठी जमिनीवर चिकटपट्ट्या (स्टिकर) वापरून एक- रांग पद्धतीचा अवलंब करावयाचा आहे. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल. सभागृहाच्या/प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थांची पोचवणी करण्यास मनाई करण्यात येईल. खाद्यपदार्थाच्या व पेय पदार्थाच्या क्षेत्रात सुरक्षित अंतराचे पालन होत असल्याची व गर्दीला आळा घातला जात असल्याची खातरजमा व्यवस्थापनाकडून करण्यात येईल. खाद्यपदार्थाच्या व पेय पदार्थाच्या कचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जात असल्याबाबत परिवास्तूच्या व्यवस्थापनाकडून खातरजमा करण्यात येईल. कोविड-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निदेश तसेच गृह कार्य मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन इत्यादींनी जारी केलेली संबंधित मार्गदर्शक तत्त्वे यांचे सर्व कार्यामध्ये व व्यवहारांमध्ये काटेकोरपणे पालन करण्यात येईल.
Related Posts
-
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद…
-
राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत आज झालेल्या…
-
राज्यात होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
राज्यातील आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु
मुंबई/प्रतिनिधी - प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
आता दहा जून पासून राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून पासून सुरू…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार
मुंबई/प्रतिनिधी - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER)…
-
कारागृहांमध्ये बंदीजनांकरीता उपलब्ध होणार स्मार्टकार्ड फोन सुविधा
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे…
-
राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची लालपरी धावणार
मुंबई/प्रतिनिधी - आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची…
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
राज्यातील कंत्राट भरती विरोधात वंचितचा आंदोलनाचा इशारा.
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - राज्य सरकारने…
-
बारावीचा परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांच्या वेतन निश्चितीचा निर्णय
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सरळ सेवेने किंवा थेट नियुक्त…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
आता वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक…
-
डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार, प्रदुषणाच्या विळख्यातून डोंबिवली होणार मुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक,…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
राज्यातील वाळू, रेती उत्खननाबाबत नवीन धोरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील नदी व खाडी…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
पंढरपूरात होणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी व कोविडच्या रुग्णांना वेळेत…
-
राज्यातील शिक्षकांच्या नावा पुढे लागणार टीआर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - शिक्षक आपल्या समाजातील…
-
कल्याणात राज्यातील तृतीय पंथीयासाठीचे पहिले निवारा केंद्र
कल्याण/प्रतिनिधी - रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक…
-
विनापरवाना डीजे लावणाऱ्या २२ जणांवर कारवाई
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - सध्या सगळीकडे लगीनसराई…
-
राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित…
-
निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतीचे मतदान १२ मार्चला होणार
प्रतिनिधी. मुंबई - विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
कल्याण डोंबिवलीत मास्क न लावणाऱ्यांची होणार कोवीड चाचणी तर मॅरेज हॉल होणार सील
कल्याण प्रतिनिधी -वाढत्या कोवीड संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासनाने नविन निर्बंध…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
२४ जानेवारी पासून राज्यातील शाळा पुन्हा सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सोमवार दि. २४ जानेवारी…
-
चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम…
-
कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील…
-
राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोबरपासून होणार खुली
मुंबई/प्रतिनिधी - नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…