महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी वंचितचा पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा

डोंबिवली/प्रतिनिधी – सांस्कृतिक डोंबिवली शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे तरुण मुले व्यसनी होत आहेत. यावर पोलीस प्रशासनाचा अंकुश नसून त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोपही डोंबिवलीकर करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे. या परिस्थिवर नियंत्रण आणून संबंधित व्यक्तींवर कारवाईने करा या मागणीसाठी रामनगर पोलीस ठाण्यावर वंचित पदाधिकाऱ्यांनी निषेध मोर्चा आणून कायदा सुव्यवस्थेची मागणी केली.

यावेळी वंचितचे सुरेंद्र ठोके यांनी सांगितले की, डोंबिवली शहरातील चार ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्रास मटका, गावठी दारु, ऑनलाईन लॉटरी, डान्सबार, क्लब, गांजा, चरस, गुटका विक्री जोरात सुरु आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा निवेदने देवून अवैद्य धंदे बंद करावे जेणेकरुन शहरातील अल्पवयीन मुले वाईट व्यसनाकडे वळून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर परिणाम होणार नाही. या आमच्या मागणीकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुले वरील प्रकारच्या वाईट व्यसनाच्या अधीन जाऊन त्यांच्याकडून गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडले आहेत. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा विचार करता सदर अवैद्य धंदे बंद करण्याचे, संबंधीतांवर कारवाई करण्याचे रॅकेट चालकांना पाठीशी घालणाऱ्यावर संबंधितावर तात्काळ निलंबित करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी निदर्शना दरम्यान पोलिसांना दिलेल्या निवेदनात केल्याचेही सांगितले.तसेच डोंबिवली सारख्या सुसंस्कृत शहराचे व्यसनाधीन शहर होण्यापासून वाचवावे असे म्हटले असून या निषेध निदर्शनात वंचित बहुजन पार्टीचे पदाधिकारी सरेंद्र ठोके, राजू काकडे, मिलींद साळवे, राहुल जाधव, बाजीराव माने, अर्जुन केदार, रेखा खारे, रेखाताई कुरवरे, वैशाली कांबळे, अस्मिता सरोदे, अशोक गायकवाड, दत्ता शेळके, नंदू पाईकराव, विलास मोरे, शांताराम तेलंग, संतोष खंदारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×