कल्याण/संघर्ष गांगुर्डे -शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले .एक्स्प्रेस ने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली . 16 प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले त्याच्याकडून मोबाईल व रोकड हिसकावून घेतली दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी पती सोबत प्रवास करणाऱ्या 20 वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर लैगिक अत्याचार केला .तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता .कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला यामधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले.
याप्रकरणी प्रवाशांनी दोन आरोपीला पकडून दिले .त्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला . या प्रकरणी चार आरोपीना काल अटक करण्यात आली होती . काल रात्री उशिराने आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली तर उर्वरीत तीन फरार आरोपीचा शोध कल्याण रेल्वे पोलिसांची पथके घेत होती. सर्व आरोपी इगतपुरी घोटी परिसरातील असल्याची माहिती मिळताच पोलिसाचे पथक मागील 24 तास या भागात आरोपीचा माग काढत होते. अखेर या प्रकरणातील आठ ही आरोपीना अटक करण्यात आली आहे .अर्षद शेख ,प्रकाश पारधी ,अर्जुन परदेशी ,किशोर सोनवणे ,काशीनाथ उर्फ काश्या तेलंग ,आकाश शेनोरे धनंजय भगत उर्फ गुड्डू,राहुल आडोळे अशी आरोपींची नावे आहेत.त्यांना न्यायालयात हजार केले असता त्यांना माननीय न्यायालयाने १६ तारखे पर्येंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.