संघर्ष गांगुर्डे
मुंबई- कोरोना ने जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे आरोग्याचा तर प्रश्न निर्माण झाला आहे पण त्याच बरोबर सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे, उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. संपूर्ण देशाचे वातावरण ढवळून निघाले आहे. प्रशासन आपल्या परीने काम करत आहे. कोरोनाच्या साथीमुळे अनेक प्रश्न अडचणी निर्माण झाल्या आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या लोकाच जगन हे रोजच्या कामावर अवलंबून आहे असे लोक,ज्या लोकाचे पोट हे हातावर आहेत ते लोक,जे लोक रोज कमवून खातात असे लोक लॉकडाऊन मुळे अशा लोकांना जगन कठीण झाल आहे. लोकांना काम नाही म्हणून घरी खायला नाही. यांना फक्त दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. अशा सर्वसामान्य गरजू लोकांना आप आपल्या परीने आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. ज्या लोकाचे काम सुटले आहे त्यांना आन्यधान्याची मदत करावी,ज्यांना शक्य आहे त्यांनी काही निधी द्यावा असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले आहे. त्याच बरोबर कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून शासनाने जे उपाययोजना सुचवलेल्या आहे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे आणि कोरोना नियंत्रणासाठी मदत करावी. घरात रहा सुरक्षितत रहा अशी अपील बाळासाहेब आंबेडकरानी केली आहे.