डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली पश्चिम येथील म्हात्रे वाडी भागातील त्रिभुवन ज्योत या तळ अधिक चार मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर कॅन्टीलीव्हर म्हणजे ओपन टेरेस चा भाग हा खालच्या बाल्कनी वर कोसळला आहे.या ठिकाणी कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नाही. परंतु जो भाग कोसळला त्या खालचा रस्त्यावरती कोसळला इथपर्यंत घटना घडलेली आहे. ही इमारत २८ -२९ वर्षापूर्वीची आहे इमारतीची गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांनी दुरुस्ती करून घेतलेली आहे. परंतु ह्या घटनेमुळे त्यांच्या इमारतीला आज महापालिकेकडून २६५ ए कलमानुसार महापालिकेच्या पॅनल वरील स्ट्र्चरल ऑडिटरकडून रिपोर्ट करून घेण्याची नोटीस देण्यात आली आहे.तसेच ज्या ठिकाणचा स्लॅब पडलेला आहे त्या भागाच्या खालच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणे बाबत सूचना दिल्या आहेत. २४ तासात स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यावर त्यांनी ऑडिटरच्या रिपोर्टनुसार आवश्यक निर्णय घेऊन इमारत दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याबाबत ठरवायचे आहे अशा त्यांना सूचना देण्यात आले आहेत. या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पालिकेला देण्यात आली. प्रशासनाने लागलीच दखल घेत या इमारतीची पाहणी केली. कोणालाही दुखापत झाली नाही . या इमारतीच ऑडिट करण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली. संबंधित इमारत ही सुमारे २९ वर्ष जुनी आहे. ५ वर्षांपूर्वी सोसायटीनं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं. या ठिकाणी अजून कोणता अतिधोकादायक भाग आहे का? त्याची देखील पाहणी करण्यात आली. मात्र असे काही आढळले नाही. तरी ज्या इमारती ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत.अशा इमारतींना नोटीस पाठवण्यात येत असून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. संबंधित इमारतीचही स्ट्रक्चरल ऑडिटच काम सुरू असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
- September 20, 2021