डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवलीत चोरट्याने एका रात्रीत दोन एटीम फोडले ,मात्र हाती काहीच लागलं नाही,दरम्यान दुसरं एटीएम फोडन्याच्या प्रयत्नात असताना काही नागरिकांचे लक्ष गेलं त्यांनी याबाबत तत्काळ राम नगर पोलिसांना माहिती दिली .घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर फिल्मी स्टाईलने पाठलाग करत या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे .असगर शेख अस या चोरट्याच नाव असून तो मुंबई येथील डोंगरी परिसरात राहणारा आहे.
डोंबिवली पूर्वेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय .डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळेस चोरटय़ांनी एक एटीएम फोडले मात्र पैसे काढण्याचे या चोरट्याचे प्रयत्न अयशस्वी ठरला, हार न मानता या चोरट्याने काही वेळातच रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिळक चौकातील एका बँकेचे एटीएम लक्ष केलं एटीएम फोडण्याचा अथक प्रयत्न करून देखील तो एटीएम फोडू शकला नाही दरम्यान हा चोरटा एटीएम फोडत असताना काही नागरिकांनी त्याला पाहिला नागरिकांनी याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात माहिती दिली . घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना पाहून या चोरट्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र रस्ते माहित नसल्याने तो सैरावैरा पळत होता अखेर वीस मिनिटे पाटलाग करत पोलिसांनी या चोरट्यांना पकडले असगर शेख असे या चोरट्याचा नाव असून तो मुंबईतील डोंगरी परिसरात राहतो असगर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात आणखी किती गुन्हे दाखल आहेत याचा तपास पोलीस करत आहेत