महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image आरोग्य ताज्या घडामोडी

महाराष्ट्रात एकाच दिवसात सुमारे ११ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण

मुंबई/प्रतिनिधी – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आता पर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

२१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज (दि. ४ सप्टेंबर) झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे, रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ६ कोटी १५ लाख १६ हजार १३७ लसींच्या मात्र देण्यात आल्या असून त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या आज जारी केलेल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात  १ कोटी ७१ लाख जणांना दुसऱ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×