कल्याण/प्रतिनिधी – कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केडीएमसी प्रशासनाने यंदाही मोठा दिलासा दिला आहे. परवानगीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरण्याचा महत्वाचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत ऑनलाईन झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. त्याचसोबत केडीएमसी क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी यंदापासून फायर एनओसी बंधनकारक करण्यासह विविध नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असून आर्थिक अडचणीत आलेल्या गणेशोत्सव मंडळांना शुल्कमाफ करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळांसह सामाजिक, राजकीय व्यक्तींकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत ऑनलाईन बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच कोवीडबाबत शासनाकडून जारी करण्यात आलेले नियम पाळून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत शुल्कमाफीचा निर्णय जाहीर केला.
कोरोनाचे संकट पाहता यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगीसाठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच इमारतीमध्ये बसविल्या जाणा-या गणेश मंडळांनीही फायर एनओसी घेणे बंधनकारक असल्याची माहिती आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.
शासकीय परवानगीसाठी एक खिडकी योजना
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वाहतूक पोलिस अग्निशमन विभागाचा ना-हरकत दाखला, महावितरणकडील तात्पुरती वीज मीटरची परवानगी आणि स्थानिक पोलिस स्टेशनचा ना-हरकत दाखला आदी परवानग्या देण्यासाठी संबंधित प्रभागक्षेत्र अंतर्गत स्थानिक पोलिस स्टेशननिहाय कर्मचा-याची नियुक्ती केली जाणार आहे. त्याअंतर्गत “एक खिडकी योजना” कार्यान्वित करण्यात येणार असून मंडळांनी परवानगीसाठी 5 सप्टेंबर, सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
68 विसर्जन स्थळी आणि विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांचा वॉच
महापालिका परिसरात एकुण 68 विसर्जन स्थळांवर श्रीगणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली असून विसर्जन स्थळी आणि विसर्जन मार्गांवर 152 सीसीटीव्ही कॅमे-यांचा वॉच असणार आहे. तसेच या सर्व ठिकाणी 2 हजार 447 हॅलोजन लाईटची व्यवस्था करण्यात आली असून प्रकाश व्यवस्थेसाठी एकुण 66 जनरेटर बसविण्यात येणार आहेत.
यंदाही ‘विसर्जन आपल्या दारी उपक्रम’
कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी देखील “विसर्जन आपल्या दारी” हा उपक्रम महापालिकेमार्फत राबविला जाणार आहे. पोलिसांच्या मदतीने विसर्जनाचे पुर्ण नियोजन करण्यात येत असून गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघडीप दिल्यानंतर सर्व मुख्य रस्त्यांवरील तसेच विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या सुचना अधिका-यांना देण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी दिली.
गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची साईज 6×8 इतकीच
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची साईज 6×8 इतकीच असावी. गतवर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका परिसरातील कोरोनाची रुग्ण संख्या दुपट्टीने वाढली त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे तसेच कोविड नियमांचे पालन करुन जबाबदारीने आणि विहित परवानग्या घेवूनच हा सण साजरा करण्याचे आवाहन डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. या ऑनलाईन बैठकीमध्ये महापालिका क्षेत्रातील सुमारे 92 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता.
Related Posts
-
केडीएमसी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळाना मंडप शुल्क माफ
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी -संपूर्ण देशात गणेशोत्सवाची तयारी मोठ्या…
-
राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - गणेशोत्सवात उत्कृष्ट…
-
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क व अनामत रक्कम माफ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - यावर्षी…
-
केडीएमसी प्रशासन गणेशोत्सव विसर्जनासाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - यंदाच्या गणेशोत्सव विसर्जनासाठी कल्याण…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई/नेशन न्यूज मराठी टिम - राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला…
-
सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन…
-
गिरगावात गणेशोत्सव मंडळाने साकारली टिशू पेपरची गणेश मूर्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - पर्यावरण पूरक…
-
सहकारी कुक्कुट पालन संस्थांना थकबाकीबाबत दिलासा
प्रतिनिधी. मुंबई - कोविड परिस्थितीमुळे फटका बसलेल्या ग्रामीण भागातील शेतीपूरक…
-
संरक्षण उत्पादन विभागाने गुणवत्ता हमी शुल्क माफ केले
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रर्तीनिधी - सुधारणांना चालना देण्यासाठी…
-
नमुंमपा वाशी सार्वजनिक रुग्णालयात अद्ययावत डायलेसीस सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - कोव्हीड प्रभावीत कालावधीनंतर…
-
कल्याण मध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू
कल्याण/प्रतिनिधी - विसर्जनासाठी गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढत असताना विजेचा जोरदार झटका…
-
३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ –…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
केडीएमसीच्या वतीने सार्वजनिक शौचालयाची निगा राखणाऱ्या संस्थांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सार्वजनिक शौचालयांची निगा राखणार्या संस्थांचा गौरव हा खऱ्या…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या…
-
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या…
-
बँक कर्जांशी संबंधित दस्तांवर यापुढे एकसमान मुद्रांक शुल्क
प्रतिनिधी. मुंबई - मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक…
-
शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शुल्क नियामक समित्यांची स्थापना
मुंबई/प्रतिनिधी - गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शाळा बंद असतानासुद्धा अनेक शाळांनी फी…
-
राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास,धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा होणार -आरोग्यमंत्री
प्रतिनिधी . मुंबई - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात ५९ नवीन वाहने
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर…
-
सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना विहित नमुन्यात अहवाल देण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना अन्न…
-
‘उत्कृष्ट गणेशोत्सव’ स्पर्धेसाठी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव…
-
गणेशोत्सव काळात दर्शन ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा…
-
वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
मुंबई/ प्रतिनिधी - वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या…
-
नवरात्र उत्सव मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज मरठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी…
-
ऑनलाइन शिक्षण शुल्क माफ करा,वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
औरंगाबाद/प्रतिनिधी - ऑनलाइन शिक्षणाच्या मागील वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे.…
-
कल्याणात शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने साकारली श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या शिवप्रेमी माघी…
-
अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मलंगगड भागात मोठी कारवाई
अंबरनाथ/प्रतिनिधी - गटारी जवळ येत नासल्यांन गावठी दारूला सध्या शहरी…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी…
-
खासगी/सार्वजनिक बसच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या सूचना
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - खाजगी / सार्वजनिक बसेस…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगरांमधील अनेक…
-
मुंबई सीमा शुल्क विभागाने केले ३७०० किलो तंबाखूजन्य पदार्थ नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - प्रशासनिक सुधारणा आणि…
-
परराज्यातून येणारा पाच लाखाचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
WWW.NATIONNEWSMARATHI.COM संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला…
-
निर्यात उत्पादन शुल्क आणि कर सवलत ३० जून २०२४ पर्यंत
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - …
-
महाराष्ट्रातील ९ दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील 9 दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक…
-
राज्यात दहा कोटी लसीकरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार…
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू हातभट्ट्यांवर धाडी
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/wVyTo8J7Xcg सोलापूर/प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा राज्य…
-
तात्पुरत्या स्वरुपात घरगुती दराने अधिकृत वीजजोडणीसाठी ,महावितरणचे गणेश मंडळांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - सार्वजनिक गणेश…
-
बनावट विदेशी मद्याची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - मोरी रोड, माहिम येथील…
-
सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली…
-
कांदा निर्यात शुल्क रद्दसह पीक विमा मागणीसाठी स्वाभीमानीचा तुळजापुरात रास्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - सरकारने कांदा…
-
एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत - ऍड. प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचे…
-
लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
चंद्रपूर/प्रतिनिधी- सरकारी कार्यालयात खाबुगिरी ही काही नवीन नाही. पण याच…
-
मच्छीमार सहकारी संस्थांना मोठा दिलासा, तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोरोना प्रादुर्भाव काळात राज्यातील मच्छिमार,…