कल्याण/प्रतिनिधी – कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालकामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होतं .विना परमिट ,विना परवाना ,विना गणवेश रिक्षा चालवू नका अस आवाहन करत नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई होईल असा वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना 10 दिवसांचा अलटीमेटम देत कारवाईचा इशारा दिला होता.अखेर आज पासून कल्याण शहर वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या संयुक्त विद्यमाने आजपासून रिक्षाचालकावर कारवाई करण्यास सुरुवात केली . कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी करत रस्ता अडविणार्या विना परवाना ,विना गणवेश आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारत तब्बल 600 रिक्षा तपासत 90 रिक्षावर दंडात्मक कारवाई करण्यात आली . या पुढे ही कारवाई सुरु राहील असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Related Posts