कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती .कल्पिता पिंपळे यांच्या हातावरील बोटावर चाकूने हल्ला झाला होता त्यात त्यांची दोन बोटे छाटली होती या घटनेनंतर पिंपळे यांना तात्काळ ज्युपिटर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर आज ठाणे मनपाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या वरती झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून काम बंद आंदोलन पुकारले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन शासनाकडे सशस्त्रधारी पोलीस संरक्षण मिळण्यासाठी आयुक्तांमार्फत शासना कडे मागणी केली आहे, ठाण्यात घडलेल्या घटनेमुळे कल्याण डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसून येत आहे.