ठाणे/प्रतिनिधी – ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.ठाण्यात एकीकडे अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती .कल्पिता पिंपळे यांच्या हातावरील बोटावर चाकूने हल्ला झाला होता त्यात त्यांची दोन बोटे छाटली होती या घटनेनंतर पिंपळे यांना तात्काळ ज्युपिटर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली.तुम्ही लवकर बरे व्हा बाकी आम्ही पहातो असा धीर राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना दिला.
पत्रकाशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की घडलेली घटना दुखद घटना आहे.आशा प्रकाराची हिम्मत होते कशी हि हिम्मत ठेचणे गरजेचे आहे.पोलिसांनी कारवाही केली आहे न्यायालयही त्यांनी कारवाही जोख करेल, त्याला कठोर शिक्षा होईल अशी मला आशा आहे.