मुंबई/प्रतिनिधी – कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
या मिशननुसार गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शहरी क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये वार्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके गाव, शहरातील एकल, विधवा महिला, अनाथ बालकांच्या कुटुंबियांना भेट देवून शासनाच्या विविध योजनांची माहिती देतील. तसेच विविध योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन परिपूर्ण प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे सादर करतील.
या मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यात तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार हे असून तालुका शिक्षण अधिकारी, तालुका विधी सेवा प्राधिकरण, नगरपारिषदेचे मुख्याधिकारी, वरिष्ठ पोलिस निरिक्षक/ पोलीस निरिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (समाज कल्याण), तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील तालुक्यात उपयोजनेचे प्रकल्प अधिकारी, तालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), एकल/ विधवा महिला व अनाथ बालकांच्या पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी हे सदस्य तर बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/ शहरी) हे सदस्य सचिव असणार आहेत.
यामध्ये कुटुंब निवृत्तीवेतन योजना, एलआयसी किंवा इतर विमा पॉलीसीचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, श्रावण बाळ योजना, बालसंगोपन योजना, घरकुल, कौशल्य विकास, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, शुभ मंगल सामुहिक योजना, अंत्योदय योजना, आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आदींशिवाय अन्य योजना तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम यापैकी ज्या ज्या योजनांसाठी संबंधित महिला किंवा बालक पात्र असेल त्या योजनांचे अर्ज भरुन घेऊन त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत.
याशिवाय अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व शुल्क यासंबंधाने काम केले जाणार असून महिला व बालकांचा मालमत्ता विषयक हक्क अबाधिक राखण्यासाठी मदत पुरवण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, जन्म/ मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे नसतील ती मिळवून देण्यासाठी सर्व सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
राज्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मार्च, 2020 नंतर 18 हजार 304 बालकांनी आई- वडिलांपैकी एक पालक कोरोनामुळे गमावला आहे. त्यापैकी 16 हजार 295 बालकांनी वडिल गमावले असून त्यांच्या माता विधवा झाल्या आहेत. तसेच 2 हजार 9 बालकांच्या मातांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. तसेच 570 बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. त्यापैकी 547 बालके 18 वर्षाखालील आहेत. त्यामुळे या विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे मिशन आम्ही हाती घेतले असून यंत्रणांच्या सहाय्यातून आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
Related Posts
-
कल्याणात संविधान दिनानिमित्त 'लोकशाहीसोबत चाला'या उद्देशाने मॅरेथॉन रॅली
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी -आज ७४ व्या संविधान…
-
केडीएमसीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुस-या टप्प्यातील उपक्रमाचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - आज विकसित भारत…
-
केडीएमसीची " विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०" लसीकरण मोहिम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
१२ वीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा…
-
या दोन गावात एकही गावकरी गणपती घरी आणत नाही
कल्याण ग्रामीण - राज्यात,देशात किवा परदेशात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा…
-
भारताचा स्वातंत्र्यलढा १७५७ ते १९४७ या कालावधीतील प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील…
-
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन व फरक
प्रतिनिधी. पुणे - ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व बदलापूर…
-
मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाटात मिशन ट्वेंटीएट
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - मेळघाटात मातामृत्यू व बालमृत्यू…
-
शासन शब्दकोश भाग-१ आता गुगल प्लेवर उपलब्ध
मुंबई/प्रतिनिधी - शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द…
-
कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कल्याण डोंबिवली मनपा सज्ज
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी महापालिका सज्ज असून कोरोना संक्रमित बालकांकरीता…
-
राष्ट्रीय कर्तव्यासाठी एकत्र या केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी याचे आवाहन.
प्रतिनिधी. कल्याण- कल्याण-डोंबिवलीत दिवसदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.…
-
कराेनाविराेधातील लढाई सक्षमपणे लढू या -जिल्हाधिकारी निधी चौधरी
प्रतिनिधी. अलिबाग- राज्यामध्ये कोविड-19 रुग्णांमध्ये व करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्यूमध्ये…
-
कंत्राटी नोकर भरतीच्या शासन निर्णयाला पँथर सेनेचा तीव्र विरोध
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - कंत्राटी पद्धतीने…
-
पालकमंत्र्यांची यादी जाहीर,पहा आपल्या जिल्हाच पालकमंत्री कोण?
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ‘यू ॲण्ड मी अनप्लग्ड’ या कादंबरीचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय नौदलातील लेफ्टनंट कमांडर…
-
या १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ठाणे महानगरपालिकेलगतच्या १४ गावांचा…
-
शासन लक्षवेधी निळा सत्याग्रहात आदिवासी भटके विमुक्त संघटनेचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - आदिवासी भटक्या…
-
शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण
मुंबई/प्रतिनिधी - ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे.…
-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समृद्ध वृद्धापकाळ या विषयावर चर्चासत्र
मुंबई/प्रतिनिधी - येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1…
-
कँन्सर पिडीतांमध्ये आत्मविश्वास जागविणारे "संध्या" या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - आदर्श आई, पत्नी आणि परिचारिका या भूमिका…
-
'भारत ड्रोन शक्ती २०२३' या पहिल्यावहिल्या ड्रोन प्रदर्शनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी -देशातील संरक्षण…
-
ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाने ओला, उबर व…
-
महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य कोकणातील कातळशिल्पे या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार
मुंबई /प्रतिनिधी - युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दरवर्षी 18 एप्रिल हा…
-
मनसेने आपल्या पायावर धोंडा मारून घेतलाय,राजन साळवींचा हल्लाबोल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राजकारणात कधी काय…
-
भारताच्या जी 20 अध्यक्षतेवरील "पीपल्स G20" या ईबुकचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - माहिती…
-
आता या स्टोअरमध्ये मिळणार वाईन, सरकारचा मोठा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सूपर मार्केटमध्ये किंवा वॉक…
-
भरारी पथकाच्या विशेष मोहिमेत तीन दिवसात साडेतीन कोटीच्या वीजचो-या उघडकीस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
बीएमसीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल…
-
शाळा आपल्या दारी,एकात्मिक आदिवासी प्रकल्प अकोला कार्यालयाचा उपक्रम
प्रतिनिधी. अकोला - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येणाऱ्या…
-
आशियाई चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडून १० लाखांचे अर्थसहाय्य; शासन निर्णय जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - यंदाचा 19 वा आशियाई…
-
जळगाव मध्ये “भारताचे संविधान” या विषयावरील मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - संविधान दिना निमित्त भारत…
-
आम्ही सावित्रीच्या लेकी या ग्रंथाचे उत्साहात प्रकाशन
सोलापूर : प्रतिनिधीमहिलांचा विकास झाला तरच समाजाचा आणि पर्यायाने देशाचा…
-
मिशन सागर IX अंतर्गत आयएनएस घडियालची सेशेल्समध्ये तैनाती
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - मिशन सागर IX अंतर्गत हिंदी…
-
दिल्ली, शक्ती आणि किल्तन या भारतीय नौदलातील जहाजांचे सिंगापूर येथे आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
शक्ती कायदा विधेयका मध्ये या असतील तरतूदी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला…
-
स्कॉर्पिन प्रकारातील ‘वागीर’ या पाचव्या पाणबुडीचे भारतीय नौदलाकडे हस्तांतरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी- प्रकल्प -75 मधील कलवरी…
-
छत्रपती शासन गणेश मित्र मंडळाने साकारला बैलगाडा शर्यतीचा देखावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने…
-
कल्याण स्थनाकावर अन्य राज्यातून येणा-या नागरिकांना ॲन्टीजेन टेस्ट बंधनकारक
कल्याण/प्रतिनिधी - 1 एप्रिल रोजी 2400 पर्यंत गेलेली कल्याण डोंबिवलीतील…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांकडून दंड़ वसूली
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - स्वच्छ…
-
कर्मचारी भरतीच्या शासन आदेशाची होळी करत राष्ट्रवादीचा निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - कंत्राटी पद्धतीने…
-
पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांत होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २…
-
मुंबईत फ्लेमिंगो’पक्ष्यांवर आधारित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळाच्या…
-
महिला आयोगाकडून क्षमताबांधणी संवेदनाजागृती' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय महिला आयोगाने…
-
कल्याणच्या या भागात उद्या सकाळी ६ते दुपारी २ पर्येंत लाईट नाही
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या १००/२२ केव्ही मोहने…