जळगाव/प्रतिनिधी– जळगावात सुवर्ण व्यवसायिकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला. सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती विरोधात जळगाव शहरातील 150 तर जिल्हाभरातील 2000 सराफा व्यवसायिकावतीने आज बंद पुकारण्यात आला होता. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती ही करण्यात येऊ नये अशी मागणी सराफ व्यवसायिकांची केली. हूड नुसार सुवर्ण व्यावसायिकांकडे जितके अलंकार सोने,चांदी आहे त्यांची नोंद ठेवावी लागणार आहे. त्यापेक्षा जास्त वस्तू सापडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते. आज याच पार्श्वभूमीवर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गौतम लुनीया ,उपाध्यक्ष अजय ललवाणी, सचिव स्वरुप लुंकड यांच्या माध्यमातून आज सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला होता.
Related Posts