कल्याण/प्रतिनिधी– सरकारने लोकडाऊन मधील निर्बंध शिथिल करत राज्य 15 ऑगस्ट पासून मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती .मात्र त्याचवेळी मॉल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना देखील कोरोना लसीचे 2 डोस बंधनकारक करण्यात आले होते . मात्र राज्य सरकारच्या या अटीमुळे दोन दिवसात ग्राहकच मॉलमध्ये फिरकले नसल्याचे मॉल चालकांचे म्हणणे आहे .तसंच मुळातच पंचेचाळीस वर्षाखालील नागरिकांच्या लसीकरणाला मे-जूनमध्ये सुरुवात झाली त्यांचा दुसरा डोस इतक्या लवकर येणे कसे शक्य आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय .लसीकरणाचा वेग पाहता सध्या तरी दोन डोसची अट पाळून मॉल सुरू ठेवण अशक्य आहे त्यामुळे हताश होऊन मॉल बंद ठेवण्यात आला आहे.
सरकारने ही अट शिथिल करून काहीतरी पर्याय द्यावा अशी मागणी मॉल मालकांनी केली आहे
Related Posts