कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महाकवी वामनदादा कर्डक. एक असे व्यक्तीमत्व ज्यांनी आपल्या कविता, गझल आणि गीतांतून समता-बंधुता-न्याय ही आपल्या संविधानाची त्रिसूत्री आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार खेडोपाडी पोहचविले. त्यांनी समाजपरिवर्तन लढ्यासाठी आपली लेखणी तहहयात झिजवली. गरीब, कष्टकरी, कामगार वर्गाच्या केवळ व्यथा आणि कथाच मांडल्या नाहीत तर समता-बंधुता-सामाजिक न्याय टिकून राहावा याकरिता देखील तळमळीने लेखन केले. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचे यजमानपद कल्याण शहराला मिळाले आहे.
लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात होत आहे. १४ ऑगस्ट रोजी कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती या समितीचे स्वागताध्यक्ष तथा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.त्याच बरोबर कायद्याने वागा चळवळीचे राज असरोंडकर जे.जे स्कुल ऑफ आर्ट्सचे गणेश तरतरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच वामनदादा यांचे गाव देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती असणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.गेल्या दोन दशकांपासून कल्याण शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वात कार्यरत पू.ल. कट्टा ही संस्था कार्यरत आहे. पु ल देशपांडे यांच्या स्मृती कल्याण नगरीत जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ह्या मंचाने आजवर अनेक साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबविले असून त्यांच्यामार्फत हा वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळा संपन्न होत आहे.
पु.ल. देशपांडे आणि वामनदादा कर्डक तशी समकालीन व्यक्तिमत्वे. पु. ल. देशपांडे आपल्या चतुरस्त्र प्रतिभेने मराठी घराघरात आणि मनामनात अधिराज्य करीत होते. त्याचवेळेस वामनदादाही आपल्या लेखणीने महाराष्ट्राच्या खेडोपाडी, वाडीवस्ती, झोपडपट्टी आणि शहरात सर्वदूर पोहोचले होते. त्यांची अनेक गाणी ही केवळ गाणी राहिली नाहीत तर ती समाज परिवर्तनाच्या लढ्याचे स्फूर्तीगीतं बनली. अनेकदा कार्यक्रमानिमित्त वामनदादा अनेक वेळा कल्याण नगरीत येत असत, वास्तव्य करीत आणि आपल्या लेखणीने अनेकांना प्रेरणा देत असत. अशा यालोककवीला मानवंदना म्हणून पु.ल.कट्ट्यातर्फे हा जन्मशताब्दी हा सोहळा साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी कल्याण नगरीतील समविचारी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर- कार्यकर्ते यांनी एकत्रित येत जन्मशताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. यामध्ये कवी-कथाकार किरण येले यांची जन्मशताब्दी समिती अध्यक्षपदी तर प्रा. प्रशांत मोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची निवड करण्यात आली आहे.
या जन्मशताब्दी सोहळ्यात वामनदादा कर्डक यांचे साहित्य आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. करोना काळात सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे कार्यक्रम केले जाणार आहेत.येत्या शनिवारी १४ ऑगस्ट २०२१ रोजी, या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या प्रमूख उपस्थितीत होणार असून कायद्याने वागा चळवळीचे राज असरोंडकर जे.जे स्कुल ऑफ आर्ट्सचे गणेश तरतरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच वामनदादा यांचे गाव देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती असणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
जन्मशताब्दी निमित्ताने उदघाटन व समारोप समारंभ होणार असून जलसा, शॉर्टफिल्म, वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे गायन स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला, कॅलिग्राफी, एकांकिका, आठवणी संकलन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक संस्था, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने दिंडी वामनदादाच्या जन्म गावांतून डिसेंबर २०२१ मध्ये निघेल व जानेवारी २०२२ मध्ये कल्याण येथे सांगता होईल. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.या उदघाटन सोहळ्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून त्यात अरुण म्हात्रे, माधव डोळे, प्रशांत वैद्य, रमेश अव्हाड, किरण येले, प्रशांत मोरे, संदेश ढगे, वृषाली विनायक आणि आकाश पवार सहभागी होणार आहेत
Related Posts
-
कल्याणात लोककवी वामनदादा कर्डक यांच्या आठवणींना मिळणार उजाळा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पू ल कट्टा कल्याण यांच्या वतीने लोककवी वामनदादा…
-
कल्याण मध्ये लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सांगता सोहळा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे. - माणसा इथे मी…
-
वामनदादा कर्डक जन्मशताब्दी आपल्या दारी अंतर्गत पु ल कट्टा टीम हिवरे बाजारात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर - महाकवी वामनदादा कर्डक. एक…
-
लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट महिला काव्यसंग्रह पुरस्कारासाठी आवाहन
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - लोककवी वामनदादा कर्डक यांचे…
-
लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सांगता सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रविवार, २१ ऑगस्ट…
-
राज्यस्तरीय वामनदादा कर्डक महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष…
-
वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवा निमित्त महिला विशेष काव्यवाचन स्पर्धा संपन्न
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- पु ल कट्टा- वामनदादा कर्डक जन्मशताब्दी…
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता अनुराधा गोरे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. मुंबई - शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मंत्रालयातील…
-
डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांच्या पुस्तिकेचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. गडहिंग्लज/प्रतिनिधी - ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
प्रतिनिधी. मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त…
-
‘महायुवा ॲप’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नेशन न्युज मराठी टिम. मुंबई- शासकीय योजना, रोजगार संधी आणि…
-
क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त…
-
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे…
-
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - धनगर समाजाला…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई/ प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.…
-
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या…
-
खा. हेमंत पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय…
-
कल्याण मध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/p6VcYFNbPkE कल्याण- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
-
अमरावतीच्या युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - युवा स्वाभिमान…
-
कल्याण मध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपची निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते…
-
युवासेनेकडून आमदार शिरसाठ यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे प्रतिनिधी - शिवसेना ठाकरे गटाच्या…
-
विनोदी साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - दिनांक 12 जून हा…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
महाराष्ट्रातील तीन पोलीसांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पोलीस सेवेत अदम्य…
-
खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटातील शिवसैनिकांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात…
-
सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भिवंडी (Bhiwandi) लोकसभा…
-
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या पत्रकरांसंदर्भातील व्यक्तव्यावर राष्ट्रवादीचे टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
-
पहलवान साहेब जीवन चरित्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्कसपटू मल्ल…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई/प्रतिनिधी - बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन…
-
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यात वातावरण चांगलंच…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान सुरज शेळके…
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
प्रतिनिधी. पुणे- जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या…
-
डोंबिवलीत भाजपची निदर्शने,नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची केली मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. सातारा - शहीद जवान विपुल इंगवले…
-
भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील…
-
शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत
नागपूर प्रतिनिधी - जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा…
-
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव / प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे…
-
'इग्नाईट' महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. रत्नागिरी/प्रतिनिधी - उद्योग संचालनालय, स्मॉल…
-
मार्ड पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांवर मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा…
-
नाशिक मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - येत्या २२ जानेवारी…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्री यांच्या कडून पाहणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या…
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…