डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबई ,ठाणे ,रायगड कल्याण-डोंबिवली, पालघर या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज 9 ऑगस्ट रोजी रायगड ,नवी मुंबई ,ठाणे ,पालघर कल्याण डोंबिवली भागात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .कल्याण ग्रामीण डोंबिवली ग्रामीण भागात देखील या मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं .डोंबिवली मानपडेश्वर मंदिर येथे मशाल पेटवून या मशाल मोर्चा काढण्यात आला . शेकडोंच्या संख्येने स्थानिक भूमिपुत्र झेंडे व फलक घेऊन या मशाल मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चात महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती .यावेळी नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव दिलं पाहिजे अशी आग्रही मागणी करत आज पर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत जर सरकारने प्रतिसाद दिला नाही तर सोळा तारखेला विमानतळाचे काम बंद करू असा इशारा भूमिपुत्रांच्या वतीने देण्यात आला.
- August 9, 2021