महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
करियर ताज्या घडामोडी

भायखळा आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु; २९ ट्रेडसाठी १५०० जागा उपलब्ध

मुंबई, दि. ९ : भायखळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) 29 ट्रेडसाठी 1 हजार 500 जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दहावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन प्राचार्य आर. बी. भावसार यांनी केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये भायखळा आयटीआयसह दादर येथे मुलींचे तसेच जनरल आयटीआय, मांडवी, धारावी, लोअर परेल, मुंबई-01 या शासकीय आयटीआयसाठीही प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

भायखळा आयटीआयमध्ये प्रवेशासाठी मार्गदर्शन करण्यात येत असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा संस्थेतच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना संस्थेत येणे शक्य नसेल त्यांनी https://admission.dvet.gov.in/  या संकेतस्थळावर भेट द्यावी. आयटीआयच्या ट्रेड (कोर्स) बद्दलची माहिती https://mumbai.dvet.gov.in/mumbai-city-institutes/iti-mumbai-11/ या लिंकवर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी https://meet.google.com/nqp-chnm-esi या गुगल लिंकवर दररोज वेळ दुपारी 3 ते 5 या वेळेत मार्गदर्शन करण्यात येते.

374, साने गुरुजी मार्ग, आग्रीपाडा पोलिस स्टेशनसमोर, घास गली, भायखळा, मुंबई – 11 येथे हे आयटीआय कार्यरत आहे. भायखळा रेल्वे स्टेशन, महालक्ष्मी रेल्वे स्टेशन व मुंबई सेंट्रलपासून 10 मिनिटांच्या अंतरावर आयटीआय आहे. अधिक माहितीसाठी विजया शिंदे (मोबाईल क्रमांक 8689986244 आणि डी.जे. गावकर  (मोबाईल क्रमांक 8689971216) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रत्येक व्यवसायाच्या तुकडीमध्ये 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. कॉम्पुटर ऑपरेटर ॲड प्रोग्रामींग असीस्टंट, सर्व्हेअर, ड्रॉप्टमन सिव्हील, ड्रॉप्टसमन मेकॅनीकल, इलेक्ट्रॉनीक्स मेकॅनीक, इन्फरमेशन कमुनिकेशन टेक्नॉलाजी आर्कीटेक्चरल, ड्रॉप्टसमन, डेक्स टॉप पब्लीशिंग (डी टी पी) इंटेरीअर डेकोरेटर, इलेक्ट्रीशियन, वायरमन या ट्रेडची महिलांमध्ये मागणी असते. महिलासांठी रेल्वेमध्ये प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध आहे.

भायखळा आयटीआमध्ये टेक्नीशियन मेडीकल इलेक्ट्रॉनीक्स, टेक्नीशियन पॉवर इलेक्ट्रॉनीक्स सिस्टीम हे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविले जातात. मुंबई हे मेडीकल व मेडीकल एक्विपमेंट मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीचे हब असून येथील हॉस्पीटलमध्ये मशिन दुरुस्तीचे काम या व्यवसायात शिकविले जाते. मुंबई येथील कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये पुष्कळ रोजगार उपलब्ध असून त्याकरिता ड्रॉफटसमन सिव्हील, सर्वेअर, कारपेंटर, इंटेरीअर डेकोरेटर आणि डिजाईन, प्लंबर, मेसन या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. मुंबईमध्ये ऑटोमोबाईल सर्वीस स्टेशन पुष्कळ आहेत. तसेच महिंद्रा अँड महीद्रा (ठाणे), आयशर सारख्या इंडस्ट्री आहेत. या इंडस्ट्रीला तसेच ॲटोमोबाईल सर्विस स्टेशनला लागणारी मेकॅनीक मोटार व्हेईकल, डिझेल मेकॅनीक, वेल्डर हे ट्रेड या आयटीआयमध्ये शिकविले जातात.

मुंबई येथे सर्विस इंडस्ट्रीमध्ये सुध्दा पुष्कळ रोजगार उपलब्ध आहेत. मुंबई येथे आयटी इंडस्ट्री आहे. त्याकरीता लागणारे कॉम्पुटर ऑपरेटर ॲड प्रोग्रामींग असीस्टंट, कॉम्पूटर हार्डवेअर ॲन्ड नेटवर्कीग मेकॅनीक तसेच सर्व्हीस इंडस्ट्रीला लागणारी वायरमन, इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक रेफ्रीजरेशन ॲड एअर कंडीशनींग, डेस्कटॉप पब्लीशींग ऑपरेटर हे अभ्यासक्रम शिकविले जातात. मुंबईत इलेक्ट्रॉनीक्स आणि आयटी इंडस्ट्रीसुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याकरिता लागणारे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेश टेक्नॉलॉजी, टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनीक्स ॲड सिस्टीमचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची गरज असते. हे ट्रेड देखील या संस्थेमध्ये शिकविले जातात. मॅनुफक्चरींग इंडस्ट्री उदा. गोदरेज, महिंद्रा ॲड महिंद्रा, भारत गिअर्स, आयशर, तळोजा एमआयडीसी तसेच ठाणे-बेलापूर रोडवर, तारापूर एमआयडीसीमध्ये पुष्कळ मॅनुफॅक्चरींग इंडस्ट्रीज आहेत. त्याकरीता लागणारे फीटर, मशिन टूल मेंटेनन्स, मशिनिष्ट, मशिनिष्ट ग्राईंडर, वेल्डर, टूल डायमेकर, टर्नर या व्यवसायाचे ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची गरज असते. अशा ट्रेडचे देखील प्रशिक्षण भायखळा आयटीआय या संस्थेत दिले जाते. या ट्र्रेडमध्ये देखील प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत, अशी माहिती प्राचार्य आर. बी. भावसार यांनी दिली.

आयटीआयची सर्वसाधारण वैशिष्ट्ये

  • प्रवेशासाठी सीईटीची आवश्यकता नाही.
  • 70 टक्के Practical आणि 30 टक्के Theory.
  • नामांकित कंपनीमध्ये On Job Training ची सुविधा.
  • रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या प्रचंड संधी.
  • विद्यावेतन सुविधा.
  • अत्यंत कमी शैक्षणिक फी (रु. 1 ते 3 हजार)
  • अॅप्रेन्टीसशिपची प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला संधी.
  • अॅप्रेन्टीसशिपची प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला अंदाजे मासिक रु. 8 हजार विद्यावेतन.
  • अनुसूचित जातीच्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी मोफत ट्रेनिंग किट.
  • Diploma Engineering ला दुसऱ्या वर्षाला प्रवेशाची संधी.
  • इयत्ता 12 वी समकक्षता
  • एका बॅचमध्ये जास्तीत जास्त 26 प्रशिक्षणार्थी.
  • किमती मशीनवर काम करण्याची संधी.
  • वयाची अट नाही.
  • Local Railway Concession सुविधा
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »