डोंबिवली/प्रतिनिधी – घराचे दार ठोठावून नका असे सांगितल्याचा राग आल्याने तिघा गुंडांनी ५ मे रोजी रात्रीच्या वेळी रस्त्यावर पोलिसांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती.विष्णूनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाल्यावर विष्णूनगर पोलिसांनी यातील एकाला आरोपीला १५ मे रोजी बेड्या ठोकल्या होत्या. यातील फरार झालेल्या दोघा आरोपींचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर तीन महिन्यांनी पोलिसांनी दोन फरार आरोपींना अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,साहिल श्रीनिवास ठाकुर उर्फ वालटया ( २२ वर्षे,रा. हनुमान निवास चाळ, चाळ नंबर २, रूम नंबर २, सुभाष रोड, डोंबिवली पश्चिम व सोमेश नवनाथ म्हात्रे ( २५ वर्षे, रा. चिंचोलीपाडा) असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.५ ऑगस्ट रोजी साडे सात वाजण्याच्या सुमारास या दोघा आरोपींना डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील हनुमान मंदिर जवळ सोन्याच्या दुकानाच्या मागे सापळा रचून अटक केली.तर १५ मे रोजी यातील अनिकेत दत्तात्रय म्हात्रे उर्फ पांडा याला विष्णूनगर पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या होत्या.पांडा हा एका गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत होता.पांडा हे पॅरोल बाहेर आला होता.डोंबिवलीतील गरीबाचा वाडा परिसरात राहणारे रुपेश शिंदे हे मुंबई येथील पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत.५ मे रोजी डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथे शिंदे हे घराच्या बाहेर चक्कर मारत असताना अटक आरोपी एकाच्या घराचा दरवाजा मोठमोठ्याने ठोठावत होते. शिंदे यांनी घराचा दरवाजा ठोठावु नका असे सांगीतले तिघांनासांगितल्यावर तिघांनी शिंदे यांना शिवीगाळ करूत मारहाण केली.
या तिघांनी शिंदे यांच्या गळयावर उजव्या बाजुला चाकुने वार करून जखमी केले होते. शिंदे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केल्यावर पोलिसांनी तिघांना शोध सुरु केला. यातील पांडा याला अटक केल्यावर दोघा फरार आरोपींचा पोलीस करून शोध घेत होते. सदर गुन्हयाचा तपास हा विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडणे व पथक यांनी गुप्त बातमीदार मार्फतीने साहिल व सोमेश या आरोपींना अटक केली.सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सपोनि गणेश वडणे, पोलीस हवालदार एस. एन. नाईकरे,पोलीस नाईक एस.के.कुरणे, बी.के.सांगळे, पोलीसा शिपाई के.ओ.भामरे, एम.एस.बडगुजर, यांनी सदरची करवाई केली.