अमरावती/प्रतिनिधी – शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे…असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज श्री विठ्ठलाला घातले.आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या शिवशाही बसला पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते.प्रारंभी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते श्री क्षेत्र कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी व पालखीचे पूजन झाले.
कौंडण्यपूर येथून दरवर्षी आई रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जाते. यावर्षीही 40 वारकऱ्यांना पालखीसह पंढरपूर येथे पोहोचण्यासाठी दोन शिवशाही बसेसची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात पुरेशी दक्षता बाळगून वारी पार पडत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वांनी आपल्यासह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे.यावेळी पालकमंत्र्यांनी पांडुरंगाचरणी जनसामान्यांच्या हिताप्रती प्रार्थना केली. हे पांडुरंगा शेतकऱ्यांचे भले होऊ दे, पाऊस पाणी होऊन शेती पिकू दे, कष्टकरी सुखावू दे आणि कोरोना महामारीचे संकट या पृथ्वीतलावरुन कायमचे नष्ट होऊ दे…असे साकडे त्यांनी याप्रसंगी घातले. पालखी सोहळा, पांडुरंगनामाचा जयघोष, वीणा- मृदंगाचा ताल यामुळे कौंडण्यपुरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पालखीचा ध्वज व तुळशीवृंदावन डोक्यावर वाहून पालखी मार्गस्थ केली. वारकरी भक्तांसह त्या फुगडीही खेळल्या. महिला व बालकल्याण सभापती श्रीमती पुजाताई आमले, विश्वस्त विजय डहाके, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचे पदाधिकारी, वारकरी मंडळी यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
Related Posts
-
कल्याण स्टेशन परिसरातून गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण पश्चिम…
- पिस्तुल आणि चाकू घेऊन दादागिरी करणे युवकला पडले महागात,पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. सांभाजीनगर/प्रतिनिधी -संभाजीनगर मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी…
-
बनावट देयकाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन टॅक्स चोरी करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू…
-
धक्कादायक; पत्नीसह २ वर्षीय चिमुकलीची निर्दयीपणे हत्या करत पतीची गळफास घेऊन आत्महत्या
बीड/प्रतिनिधी- पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून, स्वतःहा…
-
लेकीचा मृतदेह वडिलांना घेऊन जावा लागला खांद्यावर,बीड जिल्ह्यात ग्रामस्थांच्या रस्त्याविना मरणयातना
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ग्रामस्थांच्या रस्त्याविना मरणयातना सुरूच…
-
विकतचे पाणी घेऊन जगवलेल्या कांद्याला नाही भाव
नाशिक/प्रतिनिधी - राज्यभरात वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईची धग जनतेला बसत…
-
अकोला जिल्हा परिषदेची १० आरोग्य पथके कावड व पालखी मार्गावर राहणार तैनात!
नेशन न्यूज मराठी टीम. अकोला / प्रतिनिधी - दरवर्षीप्रमाणे यावर्षी…
-
युआयडीएआय घेऊन आले “रीइमॅजिन आधार” संकल्पना
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नागरिकांना आधार ओळख…
-
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृती आठ दिवसात घेऊन न गेल्यास कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई…
-
पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन चालली विठुरायाची दिंडी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात निघालेल्या दिंडीमध्ये…
-
स्मशानभूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना जीव मुठ्ठीत घेऊन करावे लागते काम
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रूग्णांसह मृतांचा आकडा…
-
दुचाकीवरून ५० लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीचा…
-
२०३० पर्यंतची गरज लक्षात घेऊन वीज पारेषणाचे नियोजन करण्याचे उर्जामंत्री यांचे निर्देश
प्रतिनिधी. मुंबई- राज्यात डेटा सेंटर, इलेक्ट्रिकल व्हेईकल स्टेशनसारखी नवी औद्योगिक गुंतवणूक…
-
श्री रूक्मिणीमातेची पालखी पंढरपूरला मार्गस्थ,पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - विदर्भातील 427 वर्षांची प्राचीन परंपरा असलेली श्री…
-
इंस्टाग्राम वर धारदार तलवार घेऊन दहशत पसरवणे तरुणाला पडले महागात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - सध्या सोशल मिडियचे…
-
कल्याणात बंदूक घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - येत्या नवीन दिवसाबरोबर…
-
कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय - उपमुख्यमंत्री
प्रतिनिधी .पुणे, १५ - कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर…
-
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण रखडलेले पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेऊन स्वत: विकसित करणार- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई /प्रतिनिधी - अनेक बँकांनी तसेच वित्तीय संस्थांनी आशयपत्र (LOI)…
-
पद्मश्री काढून घेऊन कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - कल्याण काँग्रेसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - देशाबद्दल आणि महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी पद्मश्री…
-
जादा व्याजाचे आमिष दाखवून एक कोटी घेऊन पसार झालेला आरोपी गजाआड, डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांची कारवाई
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे- शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ…
-
तुर्की बाजरीचे पिक घेऊन शेतकऱ्याने साधली आर्थिक किमया
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - धुळे तालुक्यातील बोरीस येथील…