नांदेड/प्रतिनिधी – उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा म्हणून यात असलेली गोडी ही कोणत्याही धार्मिक चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. इथल्या लोकांनीही उर्दू भाषेला आपली भाषा मानून शिक्षण-संवेदनेसह प्रगतीचे नवे मार्ग खुले केले आहेत. या ‘उर्दू घर’च्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याचा मला अधिक आनंद आहे, अशा भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या ‘उर्दू घर’ इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, माजी मंत्री नसीम खान, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार माधवराव पाटील-जवळगावकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, उपमहापौर मसुद अहेमद खान, अल्पसंख्याक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह विविध मान्यवर, ऊर्दू साहित्यिक, ऊर्दू प्रेमी यांची विशेष उपस्थिती होती.
हे उर्दू घर कला, साहित्य आणि भाषिक विकासाच्या अंगाने इथल्या जनसामान्यासाठी, उर्दू भाषिकांसाठी महत्वाची भूमिका निभावेल या दूरदृष्टीतून निर्माण करण्यात आले आहे. व्यवस्थापन समितीने उर्दू व इतर भाषावरील अनेक वैविध्य असलेले व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम येथे कसे आयोजित करता येतील यांचे नियोजन केले पाहिजे. हे उर्दू घर कला, साहित्य यांचे माहेरघर झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करुन याचे रुपांतर शादीखाना किंवा अन्य कामासाठी होणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन नव्या पिढीच्या शिक्षणाला अधोरेखीत केले.
अल्पसंख्याक समाजात बदलत्या शैक्षणिक संदर्भानुसारही विचार करण्याची वेळ आली आहे. यादृष्टीने त्यांच्या स्वयं रोजगाराला चालना देणारे कौशल्य विकासाचे केंद्रही या ठिकाणी कसे आकारात येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. येथील अल्पसंख्याक समाजातील मुलांची संख्या लक्षात घेवून कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याची मागणी त्यांनी ना. नवाब मलिक यांच्याकडे केली.
अल्पसंख्याक विकास विभागाला किमान एक हजार कोटी रुपयांचा वार्षिक निधी असला पाहिजे यासाठी आम्ही मंत्रीमंडळ पातळीवर प्रयत्न करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन जिल्ह्यातील शादीखाना, कब्रस्तान व इतर उपक्रमासाठी तूर्तास जिल्हा वार्षिक योजनेतून जेवढे यथाशक्य होईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. नांदेड येथे ईदगाह साठी असलेले मैदान कमी पडते. हे लक्षात घेता याचाही विकास करण्याचे मी असल्याचे सांगितले.
अल्पसंख्याकांच्या विकासाच्या योजना व ‘उर्दू घर’ सारखे प्रकल्प हे पुढच्या पिढीसाठीही तितकेच महत्वाचे आहेत. ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्या चांगल्या स्थितीत ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासकीय पातळीवरुन यांची देखरेख जरी समितीमार्फत केली जाणार असली तरी इथे येणाऱ्या प्रत्येकाने या ‘उर्दू घर’ कडे आपल्या घराच्या जबाबदारीने पाहून त्यात सर्वतोपरी योगदान दिले पाहिजे असे आवाहनही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या उदघाटन पर भाषणात केले . उर्दू घरचे भूमिपूजन ज्यांच्या हस्ते झाले ते तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी उर्दू घर ला दिलीपकुमार यांचे नाव देण्याबाबत केलेल्या मागणीला त्यांनी होकार देवून यासाठी एकमताने निर्णय घेवू असे स्पष्ट केले.
हिंदी आणि उर्दू भाषेकडे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून पाहिले जाते. ही भाषा इथल्या भागाची जुबान आहे, बोली आहे. उर्दू भाषा याच मातीत जन्माला आली. ज्या भाषेतून आपण शिकतो त्या भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून ‘उर्दू घर’ची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा दृष्टीकोन असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी केले. उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या योगदानातून उर्दूच्या विकासासाठी प्रयत्नाची गरज आहे. आज नांदेड येथे सुरु झालेले ‘उर्दू घर’ हे केवळ उर्दू भाषेपुरते मर्यादीत नव्हे तर मराठीसह इतर भाषेच्या प्रसाराचे, एकामेकांच्या आदान-प्रदानातून भाषिक विकासाचे प्रतिक ठरेल असा विश्वास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे उर्दूतील शिक्षण, उर्दू भाषेची त्यांना असलेली आवड आणि अल्पसंख्याकापोटी त्यांनी जपलेली कटिबध्दता ही सर्वश्रुत आहे. आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त उर्दू घरचे उद्घाटन व्हावे हे काळानेही मंजूर केलेले आहे. वास्तविक यांचे उदघाटन मागच्या वर्षी मार्चमध्ये नियोजीत होते. कोरोना मुळे ते पुढे ढकलावे लागले. ज्यांनी उर्दू भाषेसाठी योगदान दिले अशा स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचा दिवस या वास्तूच्या उद्घाटनाला मिळाल्याचा मला विशेष आनंद असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्घाटन पर केलेल्या भाषणातील मागणीचा संदर्भ घेवून त्यांनी याठिकाणी समितीकडून जे प्रस्ताव येतील त्याबाबत सकारात्मक विचार करुन अल्पसंख्यांकासाठी कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याचा प्रयत्न करु असे स्पष्ट केले. अल्पसंख्याक समाजात गरीबीमूळे न शिकता येणारा वर्ग मोठा आहे. अशा वर्गातील शिक्षणासाठी मुले जर पुढे येत असतील तर त्यांचाही प्राधान्याने विचार करु, त्यांना शिकवू असे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक वर्गातील मुलांसाठी वसतीगृहाबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले.
मोठया कष्टातून आकारास आलेल्या या ‘उर्दू घर’ला अल्पसंख्याक समाजातील बांधवांनी, उर्दू साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी, साहित्यीकांनी योगदान देण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्वक उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था अधिक नावारुपास येईल, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले. नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे हे ‘उर्दू घर’ असून याला दिलीपकुमार यांचे नाव देणे अधिक समर्पक ठरेल. त्यांचे नाव ‘उर्दू घर’ला देण्यात यावे अशी मागणी तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी करुन या केंद्रात ई-शिक्षण केंद्र आकारास कसे आणता येईल याबाबत समितीतर्फे प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले.
Related Posts
-
भिवंडीत उर्दू घर स्थापन करण्याची आमदार रईस शेख यांची मागणी
भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - भिवंडी शहराची लोकसंख्या अंदाजे पंधरा लाख एवढी असून शहरात…
-
साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय…
-
नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सवाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महिला आर्थिक विकास महामंडळाच्या…
-
मंत्रालयात इट राईट अभियानाच्या फलकाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - सर्वांना सकस आणि निर्भेळ…
-
भाजपच्या घर चलो अभियानाला लागली घरघर - विजय वडेट्टीवार
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - भाजपाने पूर्ण…
-
मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची…
-
ट्रॉम्बे युनिट मध्ये खतांच्या नवीन श्रेणींचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्रीय रसायने आणि खते…
-
पुणे कमांड रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील कमांड रुग्णालयात 30…
-
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दुबई एक्स्पोमध्ये सादर होणार
मुंबई/प्रतिनिधी - दुबई येथे 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड…
-
बीएसएनएलच्या १५ आधार सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- केंद्र सरकारने मेक इन इंडिया…
-
एमपीएससीच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८७…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
मुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘वन भवन’चे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - ‘वन भवन’ या वन…
-
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत,महाराष्ट्र सदनात सांस्कृतिक कार्यक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘एक भारत श्रेष्ठ भारत’…
-
'इग्नाईट' महाराष्ट्र कार्यशाळेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. रत्नागिरी/प्रतिनिधी - उद्योग संचालनालय, स्मॉल…
-
मालकाच्या परवानगी शिवाय घर तोडने पडले महागात, चौघांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात विनापरवानगी घर तोडल्याप्रकरणी…
-
सांस्कृतिक मंत्रालयाकडून ‘जगदीशचंद्र बोस–सत्याग्रही वैज्ञानिक’ यांच्या योगदानाविषयक आंतरराष्ट्रीय परिषद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सुप्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आचार्य जगदीशचंद्र बोस यांची 164 वी जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून विज्ञान भारती आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘जगदीशद्र बोस सत्याग्रही वैज्ञानिकाचे योगदान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती इंद्रप्रस्थ विज्ञान भारती आणि नवी दिल्लीतील आंतरविद्यापीठ त्वरक केंद्राच्या सहयोगाने ही परिषद झाली.आचार्य जगदीशचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात संशोधन करून विज्ञानात दिलेले योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन दिलेल्या योगदानाविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी, असा हेतू या परिषदेच्या आयोजनामागे होता. बोस यांनी बिनतारी रेडिओची निर्मिती केली व त्याबद्दल इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संस्थेने त्यांचा ‘रेडिओ विज्ञानाचे जनक’ म्हणून गौरव केला.
-
दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त,…
-
भारतीय स्पर्धा आयोगाच्या मुंबईतील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय अर्थ आणि…
-
मुंबई आमची बाल मित्रांची या अभियानाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी…
-
५ हजार १८३ कुटुबांना म्हाडा’ मार्फत हक्काचे घर
पुणे/नेशन न्युज टीम - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा)…
-
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा…
-
चांदवड उपजिल्हा रूगणालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लाँन्टचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य कर्मी व…
-
नवी मुंबईत ‘आयुष इमारत संकुलाचे’ उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई - केंद्रीय आयुष तसेच, बंदरे, जहाजबांधणी…
-
राष्ट्रीय कृषी संमेलन- खरीप अभियान - २०२२ चे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - कृषी मंत्री नरेंद्र…
-
‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव २०२२’ चे उत्साहात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आपल्या जीवनाला वैचारिक दिशा…
-
नाशिकमध्ये माजी सैनिक केंद्राचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नाशिक/प्रतिनिधी - 23 मार्च 2024…
-
महाराष्ट्र तांदूळ महोत्सवाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - शेतकरी ते थेट ग्राहक…
-
भिवंडी दिवाणी न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
नेशन न्युज मराठी टिम. भिवंडी/प्रतिनिधी - सामान्य माणसाला सामाजिक व आर्थिक…
-
सांस्कृतिक खात्याच्या आयोजकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - आंबादास दानवे
नेशन न्यूज मराठी टिम. नवी मुंबई/प्रतिनिधी- काल झालेली घटना ही…
-
मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी मेळावा प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन
नाशिक /प्रतिनिधी - नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला व…
-
राष्ट्रपतींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या अधिकारांसंदर्भातील पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या…
-
‘हर घर है डोनर’ या अनोख्या अवयव दान मोहिमेचा आरंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अवयवदान करण्याची चळवळ व्यापक…
-
चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचे पर्यावरणमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट…
-
सांस्कृतिक मंत्रालय राजा राम मोहन रॉय यांचे २५०वे जयंती वर्ष साजरा करणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सांस्कृतिक…
-
१९ व्या सब ज्युनिअर राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन
बुलडाणा/प्रतिनिधी - क्रीडा विभागासोबतच युवक कल्याण हे महत्वाचे खाते आहे. सध्याचा…
-
सरपंच रुपाली कोकेरा यांना घर बांधून देत जिजाऊ संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर/संघर्ष गांगुर्डे - जिजाऊ शैक्षणिक व…
-
पालक ओरडतात म्हणून घर सोडले,दोघा अल्पवयीन मुलांना शोधण्यात यश कल्याण पोलिसांची कामगिरी
कल्याण प्रतिनिधी - आई वडील ओरडतात म्हणून घर सोडून गेलेल्या…
-
ठाण्यात दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - युवा साहित्य संमेलनासारख्या उपक्रमामुळे तरुण…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
'भारत ड्रोन शक्ती २०२३' या पहिल्यावहिल्या ड्रोन प्रदर्शनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी -देशातील संरक्षण…
-
मुंबईत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २९ ते ३१ जुलै दरम्यान लोकोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत…
-
टाटा मेमोरियल सेंटर येथील आशा धर्मशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी - आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल…