महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवलीत मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून ४० हजाराचा ऐवज लंपास

डोंबिवली/प्रतिनिधी – शहरात दुकान फोडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून पुन्हा एकदा मेडिकल दुकान फोडून जवळपास ४० हजाराचा ऐवज लंपास केला. वाढत्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.डोंबिवली शहरात काही दिवसांपूर्वी पोलीस चौकी समोरील मेडिकलचे शटर वाकवून चोरी झाली होती ही घटना ताजी असतानाच आज त्या दुकानाच्या 300 मीटर अंतरावर एका मेडिकल मध्ये चोरी करून दहशत निर्माण केली आहे. डोंबिवली मधील गांधी नगर परिसरातील एस के मेडिकलचे कुलूप तोडून दुकानातील रोकड आणि सामान असा ४० हजाराचा ऐवज लंपास केला.

एस के मेडिकल चे संचालक सतीश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ तारखेच्या सकाळी अंदाजे २ वाजे नंतर चोरट्यानी दुकानाचे दोन्हीं कुलुप कापून दुकानात प्रवेश केला. दुकानातील कॅडबरी, कॉस्मेटिक्स, इन्व्हर्टर आणि कॅश असा जवळपास 40 ते 50 हजाराचा ऐवज लंपास केला. या बाबत मानपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेडिकल दुकानामध्ये वाढत असलेल्या चोरी लक्षात घेता पोलिसांनी मेडिकल दुकानाच्या बाहेरील गस्त वाढविण्याची मागणी डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशनचने केलीं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×