महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे मुख्य बातम्या

नागासह नागाच्या ६ नवजात पिल्लांना सर्पमित्राने दिले जीवदान

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पुर्वेतील नेवाळी नाका मलंगरोड येथील मोहमद शाहजाद यांच्या कपाट दुरुस्तीच्या दुकानाबाहेर नाग जातीचा साप आढळून आल्याने सर्पमित्र दत्ता बोंबे,  तसेच त्या परिसरातील सर्पमित्र कुर्ला पोलिस ठाण्यात कर्तव्य करणारे,मुंबई हायकोर्ट येथे मानद पशु कल्याण अधिकारी म्हणून  नियुक्त असलेले पोलीस शिपाई मुरलीधर जाधव, स्थानिक सर्पमित्र कुलदीप चिखलकर यांना कळविले असता तातडीने घटनास्थळी सर्पमित्रांनी पोहचत  दुकानाच्या बाजुला आढोश्याला बसलेल्या नाग जातीचा पाच फुट लांबीचा विषारी सापास पकडले. 

तिथे सर्पमित्रांनी अंड्यातून बाहेर पडणारी नवजात नागांची सहा पिल्ले देखील पकडुन नागासह पिल्लांना जीवनदान दिले. सर्पमित्रांनी विषारी पाच फुट नागासह नवजात नागांच्या पिल्लांना पकडल्याचे पाहून उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्रांनी ताब्यात घेतलेल्या नागासह पिल्लांना  वन विभागाला कळवून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×