डोंबिवली/प्रतिनिधी – लोकनेते दि.बा.पाटील यांनी संविधानिक पदे भूषविली आहेत.रायगड जिल्ह्याचे खासदार असताना या देशातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतकरी मजूर, आदिवासी स्त्रियाचा मुद्दा पोटतिडकिने आणि आंदोलन करून सोडविला आहे दि.बां.पाटीलांमुळेच राज्यात शेतकरी पुनर्वसन कायदा लागू झाला. अशा त्यांच्या सामाजिक लौकिकपूर्ण कार्याचा विचार करता नवी मुंबई येथील विमानतळाला दि.बा.पाटील यांचा नांव लागेलच पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जाहीर निषेध आंदोलनात केली. पूर्वेकडील महापालिका विभागीय कार्यालयाजवळील इंदिरा चौकात डोंबिवली वंचित बहुजन आघाडी तर्फे जाहीर निषेध आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी राजू काकडे, बाजीराव माने, मिलिंद साळवे, सुरेंद्र ठोके, रोहित इंगळे, शांताराम तेलंग, बैजनाथ कांबळे, तेजस कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिलिंद साळवे म्हणाले, दि.बा. पाटील यांचे कार्य मर्यादीत नाही वंचित बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचीही विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नांव द्याव हीच भूमिका आहे. त्यांना साथ म्हणून डोंबिवली वंचित बहुजन आघाडीने महाआघाडी सरकारचा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आणि हुकूमशाही भाषा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा आम्ही निषेध करतो. निषेध असो निषेध असो आघाडी सरकारचा निषेध असो
,एकनाथ शिंदे हाय हाय, एकनाथ शिंदे
अशा घोषणा इंदिरा चौकात वंचित कार्यकर्ते कडून देण्यात आल्या.